इंटिग्रेटेड सोसाइटी आॅफ मीडिया प्रोफशनल्सचे सन्मान प्रदान
प्रतिनिधी / वर्धा :
लखनौचे येथील संस्था इंटिग्रेटेड सोसायटी आॅफ मीडिया प्रोफशनल्सचे विविध सन्मान वार्षिक आमसभेत प्रदान करण्यात आले. शनिवार दि. 27 नोव्हेंबर रोजी सेवाग्राम आश्रम, यात्री निवास येथील निर्मला गांधी सभागृहात आयोजित एका समारंभात सोसायटी द्वारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सन्मान, समाज रत्न सन्मान, जर्नलिस्ट ऑफ पैशन सन्मान, सर सिल्क बकिंघम सन्मान, महादेवी वर्मा सन्मान व मैथिलीशरण गुप्त सन्मान प्रदान करण्यात आले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सन्मान वर्धेचे पत्रकार डॉ. आनंद इंगोले, श्री गजानन गावंडे, चूनार मिर्जापुरचे राजीव कुमार ओझा, वर्धाचे सचिन मात्रे यांना दिला गेला. समाज रत्न सन्मान लखनौचे पत्रकार आबिद रजा व सालोड पुनर्वसन, वर्धा येथील श्री सुखदेवराव मिरगे यांना प्रदान करण्यात आला . जर्नलिस्ट ऑफ पैशन सन्मान वर्धा येथील पत्रकार अमिता शिंदे, वृणाल ढोक व अजिज शेख यांना तर सर सिल्क बकिंघम सन्मान लखनौचे प्रणाम पर्यटन मासिकाचे संपादक प्रदीप श्रीवास्तव, वर्धा येथील पत्रकार पराग ढोबळे यांना प्रदान करण्यात आला. मैथिलीशरण गुप्त सन्मान नांदेडचे वरिष्ठ कवि जयप्रकाश नागला यांना तर आधार स्तंभ सन्मान डेहराडूनचे देवेंद्र प्रजापती यांना प्रदान करण्यात आला. सन्मान रूपात स्मृती चिन्ह् व प्रमाण पत्र देण्यात आले.
सेवाग्राम आश्रमातील जमनालाल बजाज स्मृती ग्रंथालयाचे निदेशक डॉ. सिबी के. जोसेफ, इंटिग्रेटेड सोसाइटी ऑफ मीडिया प्रोफेशनल्सचे चेअरमन श्री चंद्रशेखर आणि बी एस मिरगे यांच्या द्वारे हे सन्मान देण्यात आले. या प्रसंगी ‘वर्धा वैभव’ स्मरणिका, ‘क्रेडिबिलीटि क्राइसेस आॅफ मीडिया’, पुस्तक आणि ‘प्रणाम पर्यटन’ या मासिकाच्या विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. प्रारंभी दीप प्रज्ज्वलन तथा महात्मा गांधी यांच्या फोटोला माल्यार्पण करण्यात आले. ‘वैष्णव जन तो तेने कहिए’ या भजनाने कार्यक्रम सुरू झाला.
यावेळी कुशाभाऊ ठाकरे पत्रकारिता व जनसंचार विश्वविद्यालयातील जनसंचार विभागाचे अध्यक्ष वरिष्ठ पत्रकार शाहिद अली, शोधार्थी, पत्रकार व गणमान्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गौरव कुमार आणि कोमल गोमासे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रूपाली अलोने, रंजीत, राम यांनी सहकार्य केले.
उद्घाटन सत्रानंतर जनसंपर्क व पत्रकारितेशी संबंधित विविध विषयांवर गंभीर चर्चा करण्यात आली.