इंडियन मिलिटरी स्कूल पुलगाव येथे 78 स्वतंत्र दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.

0

पुलगाव -/ सर्व प्रथम कर्नल के एच पाटिल यांच्या हस्ते ध्वजा रोहन कऱण्यात आले.त्या नंतर विद्यार्थ्यांची उत्कृष्ट भाषनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हनून कर्नल के एच पाटील, प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक, श्री रविकिरण भोजणे, सुभेदार सुनील मोहोड, सुभेदार महेश अलसपूर्कर, शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री नितिन कोठे सर उपस्थीत होते.
भारताच्या 78 व्या स्वतंत्र दिनानिमित्त वर्ग 6 ते 12 च्या विद्यार्थांनी भाषणे दिलीत.
तसेच नेपाळ येथे झालेल्या
NSKA international karate campionship स्पर्धे मध्ये पारितोषिक प्राप्त 17 विद्यार्थांचे मेडल देऊन सत्कार करण्यात आला.
आपल्या भाषणात श्री रविकिरण भोजने सर यांनी 78 व्या स्वतंत्रादिना निमित्त सर्व उपस्थितांना हार्दिक शुभेच्या दिल्या. तसेच सर्व भारतीयांनी वीर हुतात्म्यांचे स्मरण करुन स्वतंत्र अबाधित ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले.
आज जरी चंद्रावर पोहचलो असलो तरी आपाल्या भारताला संपूर्ण नभाला काबीज करायचे आहे त्यासाठी विद्यार्थांनी तंत्रज्ञान, विज्ञान या विषयात पारांगत व्हावे लागेल. तसेच आज आपला भारत स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे पण आपण सर्वांनी आपल्या भारताच्या, भारताच्या स्वातंत्र्याचा अभिमान रोज बाळगायला पाहिजे. असे मार्गदर्शन केले.सुभेदार सुनील मोहोड साहेब यांनी भारतीयांच्या रक्षणासाठी सीमेवर जवान रात्रंदिवस तैनात आहेत आज स्वातंत्र्य दिवसानिमित्त जे जवान सीमेवर आपल्या रक्षणार्थ तैनात आहे त्यांचा अभिमान सर्व भारतीयांना आहे असे शब्द उद्गारले. सुभेदार महेश अलसपूर्कर यांनी भारताला सर्वात मिठी शक्तिशाली सेना लाभली आहे सर्वांनी आपल्या सेनेचा अभिमान बाळगायला पाहिजे तसेच सैनिक म्हणजे आपल्या देशाचा अभिमान आहे सर्व कॅडेड नी सैन्यात भर्ती होण्यासाठी आवाहन करुन 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ शिक्षक श्री नितिन कोठे सर यांनी सांगीतले की जरी आज तुम्ही विध्यार्थी आहात तरी उद्याचे सैन्याचे मोठे अधिकारी आहात आम्ही तुम्हा सर्वांकडे सैन दलातील कर्तुत्व काजवणारे अधिकारी म्हणून पाहतो.
आज आपणं 78 स्वतंत्र दीन साजरा करत आहे, भारत आपली भूमी आहे तिचे रक्षण करण्याची जबाबदारी फक्त सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकाचीच नाही तर त्या सर्व भारतीयांची आहे, म्हजे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. अश्या शब्दात मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात कर्नल के एच पाटील यांनी सर्व विद्यार्थांनी नेपाळ मध्ये मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक केले तसेच आज भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध आहोत. भरताची उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी आपणं सर्व प्रयत्नशील आहो.
भारतच्या 78 व्या स्वतंत्रदिनानिमित्य सर्व भरियांना शुभेच्या दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्यन भादोरिया आणि आलोक आडे या कडेड नी केले.
सर्वाँना मिष्ठान्न देऊन कार्यक्रमाची सांगता झाली

ब्युरो रिपोर्ट साहसिक news-24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!