इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सकांनी स्वतःची उपचारपद्धतीच वापरावी – डॉ. सोनभद्रे यांचा सल्ला…..

0

 

🔥नकली डॉक्टरांविरोधात मोहीम सुरू,आरोग्य विभागाच्या तपासणीला सहकार्य करण्याचे आवाहन.

नागपूर -/ इलेक्ट्रोहोमिओपॅथी रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया आणि मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोमिओपॅथी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बैठकीत कार्याध्यक्ष डॉ. नरेशचंद्र सोनभद्रे यांनी स्पष्टपणे सांगितले की, इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सकांनी इतर कोणतीही उपचारपद्धती न वापरता फक्त आपलीच पद्धत वापरावी. कारण जर इतर उपचारपद्धती वापरताना कोणी पकडले गेले, तर संघटना त्याला कोणताही पाठिंबा देणार नाही.राज्यात बोगस डॉक्टरांविरोधात जोरदार मोहीम सुरू असून, क्लिनिकवर येणाऱ्या आरोग्य विभागाच्या तपासणी पथकाला सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले. संघटनेचे सदस्यत्व आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.बैठकीदरम्यान, दिल्ली आयडीसी समिती व महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांशी सुरू असलेल्या संवादाची माहिती देण्यात आली. तसेच, राजस्थानप्रमाणेच केंद्र व महाराष्ट्र सरकारकडूनही इलेक्ट्रोहोमिओपॅथी उपचारपद्धतीला मान्यता मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.या कार्यक्रमाला अध्यक्ष सतीश जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. रवी नितनवरे, डॉ. रमेश पाटील, डॉ. अभिमन्यू वाकुडकर, डॉ. राजकुमार शाहू, डॉ. नायडू, डॉ. मेश्राम, डॉ. वसे यांची उपस्थिती होती.

गजानन ढाकुळकर साहसिक News-/24 नागपूर,हिंगणा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!