वर्धा -/ भारत हा विविधतेने नटलला देश आहे. येथे विविध धर्म, भाषा, चालीरीती या सर्व विविधतत एकता टिकवून ठेवने म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता होय. एकात्मता ही राष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाची असते. अशी भावना वर्धचे खासदार अमर काळे यांनी व्यक्त केली.
ते रमजान ईद रोजी समाजसेवी इमरान राही यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिल्ली त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्ष सुधिर पांगुळ, अहसान राही, उस्मान राही, फैज़ान रहा, साबेरा राही, राबीया राही हुंमेरा राही, जमीर खाँन प्रामुख्याने उपस्थित होत.
खासदार अमर काळे पुढे म्हणाल की, राष्ट्रीय एकात्मतेमुळे देशात शांतता, सुरक्षा, आणि सुव्यवस्था राहते. जेव्हा लोक आपापसातील भेद विसरून एकत्र येतात, तेव्हा राष्ट्राचा विकास जलद गतीने होतो. एकात्मता ही देशाच्या अखंडतेची हमी आहे. या प्रसंगी सुधिर पांगुळ यांनी ही ईद निमित्य शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते.