उद्योग व रोजगानिर्मिती कडे पहिली झेप घेणारे ठरले सुमित वानखेडे…

0

आर्वी -/ तालुक्यातील धनोडी येथील लोअर वर्धा प्रकल्पावर ५०५ मेगा वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पास राज्य सरकारची मान्यता मिळाली असल्याचे माहीती सुमित वानखेडे यांनी दिली आहे. या बाबतीत अधिक माहिती देतांना त्यांनी सांगितले की, भारत सरकारची कंपनी सतलज जलविद्युत निगम व महाराष्ट्र सरकारची कंपनी महानिर्मिती संयुक्तपणे ३०३० कोटींची गुंतवणूक करून हा प्रकल्प उभारणार आहे. त्यामुळे स्थानिक क्षेत्राचा विकास करण्यास सक्षम असलेल्या या प्रकल्पातून १४०० व्यक्तींना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगाराची संधी मिळणार आहे. अशी माहिती देत असतांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार त्यांनी मानले आहे.सुमित वानखेडे आर्वी मतदारसंघात सक्रिय झाल्या पासून त्यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला आहे. त्यामुळे आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील प्रत्येक भागातील लोकांना भेडसावत असलेल्या समस्यांची जाण त्यांना आहे. ते आजवरच्या मतदारसंघातील उच्च पदस्थ नेत्यां सारखे नुसते समस्या जाणून घेण्यावर थांबले नाही तर समस्यांचे समुळ निराकरण करण्यासाठी नव नवीन विकासकामांचा त्यांनी धडाकाच लावला. मतदारसंघात फिरत असतांना क्षेत्रात रोजगार निर्मिती साठी पायाभूत सुविधा आजवर कोणीच केल्या नसल्याने युवकांची मुख्य रोजगाराची समस्या त्यांना जावणली. मतदारसंघातून बेरोजगारीला हद्दपार केल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असं मनाशी ठानुन सुमित वानखेडे यांनी रोजगार निर्मितीच्या संभावना तपासत रोजगार निर्मितीवर ध्यान केंद्रीत केले. त्यातूनच नवनवीन प्रकल्प मतदारसंघाला लाभले आहे.याचाच एक भाग म्हणून निम्म वर्धा प्रकल्पावर मंजूर प्रकल्पासाठी उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना आग्रही मागणी केली होती. फडणवीसांनी केलेल्या मागणीनुसार उर्जा विभागाला तांत्रिक तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. अहवाल नुसार सुचित जागेवर प्रकल्प उभारता येईल असे कळले. सुमित वानखेडे यांनी हा प्रकल्पाची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी म्हणून शासन दरबारी सात्यताने पाठपुरावा केला होता. त्या पाठपुरावाचे फलित म्हणजे हा प्रकल्प लवकरच सुरू होणार असून यातून 1400 लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. युवकांसह सर्व नागरिकांनी सुमित वानखेडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. सुमित वानखेडे यांनी केलेल्या कामांमुळे ते युवकांच्या गळातील ताईत बनले आहे.

राजू डोंगरे साहसिक news -24 आर्वी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!