चिकणी,जामणी शिवारातील घटना.मृतक संकेत किशोर भट वय 24 वर्षे
देवळी /येथून तिघे जण एका दुचाकीवरून पढेगाव येथे जात असतांना चिकणी-पढेगाव दरम्यान चिकणी शिवारात उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर दुचाकी आदळली यात दुचाकी चालक संकेत किशोर भट वय २४ वर्ष हा गंभीर जखमी झाला होता, तर त्याचा मोठा भाऊ जयवंत किशोर भट वय २६ वर्ष व रेणू जयवंत भट वय २० वर्ष तिघेही राहणार पढेगाव जखमी झाले,अपघाताची माहिती मिळताच पढेगाव येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना सावंगी (मेघे)येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, उपचारादरम्यान संकेत भट याला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर जयवंत व रेणू वर उपचार सुरू केले, ही घटना बुधवारी रात्री साडे नऊ वाजता च्या दरम्यान घडली, देवळी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला,
पढेगाव येथील संकेत व जयवंत यांचे देवळी येथे मोबाईल चे दुकान आहे,यामुळे दररोज दुचाकीने ये-जा करायचे, बुधवारी रात्री साडे नऊ वाजता दुकान बंद करून पढेगावला घरी जाण्यास निघाले यावेळी जयवंत ची पत्नी सोबत असल्याने तिघेही एम एच ३२ – १४३३ क्रमांकाच्या दुचाकीने येत होते, पण चिकणी पढेगाव डांबरी रस्त्यावर चिकणी शिवारात चिकणी येथील प्रमोद पाटील यांचे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या चाकाचे बेअरिंग फुटल्याने ट्रॉली नादुरुस्त झाली, व अर्ध्या रस्त्यावर उभी करावी लागली, संकेत दुचाकीवरून येत असताना अपुऱ्या प्रकाशामुळे ट्रॉली दिसली नाही,आणि थेट ट्रॉलीवर आदळला, पुढील तपास पोलीस करीत आहे,