🔥एकही मतदार मतदानापासून वंचित राहता कामा नये – किरीट सोमय्या.
वर्धा -/रविवार दिनांक ५ रोजी भारतीय जनता पार्टी वर्धा विधानसभा तर्फे मतदार यादी पुनरावलोकन (SIR) कार्यशाळा स्थानिक हरिराम टॉवर येथे संपन्न झाली. यावेळी वर्धा विधानसभेतील वर्धा शहर, सावंगी, पवनार आणि सेलू मंडळातील BLA2 प्रशिक्षर्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशातील सर्व राज्यात SIR प्रक्रिया केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनात राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्यात 11 राज्यात ही प्रक्रिया यशस्वी पणे पार पडली असू दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार आहे दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात ही प्रक्रिया प्रभावी पणे रबवण्याचे उद्दिष्ट असून भारतीय जनता पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना त्यासाठी BLA2 चे प्रशिक्षण देत आहे. याच प्रश्वभूमीवर महाराष्ट्र भाजपा SIR संयोजक माजी खासदार किरीटभाई सोमय्या रविवार दिनांक ५ एप्रिल रोजी वर्धा येथे दौऱ्यावरले असता वर्धा विधानसभेतील 346 बूथ वरील BLA2 ची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या सोबत भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार रामदासजी तडस, भाजपा ज़िल्हाध्यक्ष संजयजी गाते, माजी खासदार सुरेशभाऊ वाघमारे, वर्धा शहर अध्यक्ष निलेशजी किटे आणि मोठ्या संख्येने BLA 2 उपस्थित होते. अनेक उदाहरणे देऊन अतिशय सोप्या पद्धतीने SIR ची प्रक्रिया समजावून सांगितली आणि एकही मतदार मतदार यादीत नांव येण्यापासून वंचित राहणार नाही आणि एकही घुसखोर, दुबार मतदार यादीत राहणार नाही यांची काळजी भाजपा च्या BLA2 यांनी घ्यावी असे आवाहन केले. भाजपाच्या बूथ वरील कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील प्रत्येक घरात जाऊन या प्रक्रियेची माहिती जनते पर्यंत पोहचवून जनजागरण करावे आणि शासनातर्फे दिलेल्या BLO सोबत संपर्क करून निर्दोष मतदार यादी बनविण्याच्या विधायक कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
SIR लागू झाल्यापासून जुन्या सर्व मतदार याद्या निवडणूक आयोगाच्या आदेशाने रद्द होणार असून प्रत्येकाला आपले नांव नव्याने मतदार यादीत समाविष्ट करावे लागणार आहे. या आधी झालेल्या SIR नंतर २००२ साली ज्यांची नावे मतदार यादीत होती त्यांना BLO तर्फे संपूर्ण तपशील भरलेला form घरी आणून दिल्या जाणार आहे, त्यावर आपला फोटो लावून आणि सही करून तो फॉर्म BLO कडे सुपूर्द केल्यास आपले नांव मतदार यादीत समाविष्ट होईल. ज्यांचे नांव २००२ च्या मतदार यादीत नसेल किंवा जे मतदार २००२ नंतर १८ वर्षे पूर्ण केलेले असतील त्यांनी BLO कडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आपले नांव मतदार यादीत समाविष्ट करून घ्यायचे आहे. मतदार यादीचे सखोल पुनरावलोकन करणे व निर्दोष मतदार यादी बनविणे हा या अभियानाचा उद्देश आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या महत्वाकांक्षी अभियानात निवडणूक आयोगाने दिलेल्या BLO च्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण ताकदीने काम करेल आणि हे अभियान यशस्वी करेल असा विश्वास किरीटभाई सोमय्या यांनी व्यक्त केला.
कार्यशाळेचे प्रास्ताविक ज़िल्हाध्यक्ष संजयजी गाते यांनी केले तसेच मा. रामदासजी तडस आणि मा. सुरेशभाऊ वाघमारे यांचे समायोचित मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेचे संचालन वर्धा विधानसभा प्रमुख व भाजपचे SIR अभियान BLA1 श्री निलेश पोहेकर यांनी केले.