कर्ज बाजारी शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या, पेठ अहमदपूर येथील राहत्या घरी घडली घटना….

0

🔥कर्ज बाजारी शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या,पेठ अहमदपूर येथील राहत्या घरी घडली घटना.

आष्टी शहीद -/ आष्टी नजिकच्या पेठ अहमदपूर येथील राहत्या घरी दोन्हीही घराच्या मधोमध दि. 12रोजी पहाटे तीन वाजता गळफास घेतलेल्या अवस्तेत विनोद सीताराम महेतकार हे दिसून येताच एकच खळबळ उडाली.
सविस्तर असे कि,
आष्टी तालुक्यातीलअल्प भू धारक शेतकरी विनोद सीताराम मेहतकर वय 50रा. पेठ अहमदपूर येथील रहिवाशी होते. बँक चे कर्ज घेऊन शेतात पेरणी केली. मात्र सतत येणाऱ्या पावसाने तसेंच शेत पिकाला भाव नसल्याने विनोद हा चिंताग्रस्त असायचा खाजगी लोकांकडून उधारीवर घेतलेले कर्ज फेडायचे कसे या विवान्चानेत ते असायचे. दि. 11रोजी रात्री आठ वाजता जेवण करून ते टेकडीवले बाबा येथील यात्रेत ते गेले रात्र भर त्यांनी यात्रेत आस्वाद घेतला आणि पहाटे घरी आले आणि त्यांनी टोकाचा निर्णय घेतला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. दि. 12रोजी पहाटे पाच वाजता घरातील एक महिला ही बाथरूम ला जाण्यासाठी निघाली तेव्हा विनोद हा गळफास घेतलेल्या अवस्तेत दिसला. या घटनेची माहिती आष्टी पोलिसांना देण्यात आली आष्टी पोलीस घटना स्तळी पोहचले पंचनामा करून मूतदेह उत्त्रीय तपासणी करिता आष्टी येथील ग्रामीण रुग्णालय येथे पाठविला. दोन मुले पत्नी असा अप्तपरिवार आहे.

              नरेश भार्गव                        साहसिक News-/24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!