🔥काजळसरा ग्रामपंचायत नरसाळा येथे स्मशानभूमी रस्त्यावर भ्रष्टाचाराचा संशय; ९ लाखांच्या कामात फक्त मातीचा रस्ता.
हिंगणघाट -/ तालुक्यातील काजळसरा ग्रामपंचायत अंतर्गत नरसाळा येथे डी.पी./टी.सी. निधीतून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी सुमारे ९ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात या रस्त्याच्या कामात दर्जेदार बांधकाम न करता केवळ माती टाकून रस्ता तयार करण्यात आल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे.
या कामासाठी मंजूर निधीच्या तुलनेत काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच संबंधित ठेकेदाराकडून ग्रामसेवकाने कमिशन घेतल्यामुळे कामात हलगर्जीपणा झाल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. स्मशानभूमीकडे जाणारा हा रस्ता पावसाळ्यात चिखलमय होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, या कामातील अनियमितता आणि निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप होत असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.(क्रमशः)