वर्धा -/ मांडगाव येथील रहिवासी दिवाकर पाहुणे यांची मुलगी अंकिता हिने नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सिल्व्हर मेडल प्राप्त करीत यश मिळवले आहे.अतिशय गरीब घरातील अंकिता हिने मिळविलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे,घरची परिस्थिती बेताची असल्याने तिची निवड होऊनही स्पर्धेत जाता येईल की नाही ही शंका होती. पण अंकिता ने सराव सुरू ठेवला मात्र अखेर ग्रामपंचायत मांडगाव व राम मंदिर देवस्थान ट्रस्ट मांडगाव यांच्या पुढाकाराने काही रक्कम जमा करण्यात आली व उर्वरित रक्कम तिच्या पालकांनी खर्च करून तिला नेपाळला पाठविले. तिने ही विश्वास सार्थ करीत सिल्व्हर मेडल जिंकत आपल्या शाळेचा,कॉलेजचा,गावाचा मान वाढविला आहे .तिने तिच्या यशाचे श्रेय आई वडील ,तिचे प्रशिक्षक कृष्णा ढोबळे सर यांना दिले असून ती विकास विद्यालय मांडगाव येथिल विद्यार्थीनी होती.