आष्टी शहीद -/ स्थानिक लहान आर्वी येथील जि.प.उच्च प्राथमिक केंद्र शाळेची विद्यार्थिनी कु.आराध्या सुनिल प्रांजळे हिची नवोदय विद्यालय (सेलू काटे) वर्धा येथे निवड झाली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून, ग्रामपंचायत व शाळेच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले.लहान आर्वी ग्रामपंचायतचे सरपंच सुनील साबळे, उपसरपंच अमोल होले, सदस्य सागर नागापुरे व संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यगण यांनी आराध्याचे कौतुक केले आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. अश्विनी चरडे, उपाध्यक्ष सौ. पूनम राऊत, सदस्य सौ. शोभाताई गावनेर, सागर नागापुरे,मुख्याध्यापिका सौ. तारा राठोड, पदवीधर शिक्षक मोहन खारकर,अनिल ठाकरे, सहाय्यक अध्यापक सुहास मानकर ,सौ.वर्षा अकोलकर, कु. गायत्री भेंडेकर आणि संपूर्ण गावकऱ्यांनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.आराध्याने आपल्या मेहनतीने हे यश संपादन केले असून, तिच्या यशाने शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे.