कृ.उ.बा.स.सिंदीचा आधार एक हात मदतीचा कार्यक्रमातर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत…

0

🔥कृ.उ.बा.स.सिंदीचा आधार एक हात मदतीचा कार्यक्रमातर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत.

सेलू -/ येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आधार एक हाथ मदतीचा कार्यक्रम अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमध्ये बैल दगावले अश्या शेतकऱ्यांना एक मदत म्हणून बाजार समिती कडून रकमेच्या धनादेश चे वाटप करण्यात आले. यामध्ये नागसेन गायकवाड सुरगाव, सागर तेलरांधे घोराड, मारोती खैरकार चांणकी, दिलीप चाफडे खापरी, रमेश मोहदुरे तुळजापुर, संजय कोटंबकार कोटंबा, अभय ढोकणे मदणी, मोतीराम राऊत घोराड,रवींद्र भोगे आमगाव, सुरेश डांभारे क्षीरसमुद्रपूर इत्यादी शेतकऱ्यांना सभापती केसरीचंद खंगार ्यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी उपसभापती प्रमोद आदमने, संचालिका राणी देशमुख, रेणुका कोटंबकार, गुणवंत कडू, विद्याधर वानखेडे, सचिव भांडारकर, आर्टिटेक्ट लाडे, कर्मचारी उपस्थित होते. तसेच यापुढे अशी आपदा आल्यास अटी पूर्तता करून शेतकऱ्यांना त्वरित धनादेश चे वाटप करण्यात येईल अशे सर्व संचालकांनी सांगितले.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-24 सेलू,वर्धा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!