🔥कोटंबा ग्रामपंचायत परिसरात SSB हेड कॉन्स्टेबल चंचल मंगेश उईके यांना दिला ध्वजारोहण करण्याचा मान
सेलु -/तालुक्यातील कोटंबा गावातील सुपुत्र चंचल मंगेश उईके, सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून देशसेवा बजावत आहेत. त्यांच्या कार्याचा गावाला अभिमान असून, आज कोटंबा ग्रामपंचायत कार्यालय परिसरात प्रशासक सरपंच रेणुका कोटंबकार यांनी त्यांना सन्मान देऊन त्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
देशसेवेत योगदान देणाऱ्या आपल्या गावातील जवानाचा सन्मान होत असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक वृषभ आंबटकर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील मुलासह गावात प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी प्रशासक रेणुका कोटंबकार, ग्राम विकास अधिकारी भगवान कंठाळे, प्रशासकीय सदस्य अरविंद तुमडाम ,रंजना राऊत ,संगीता मसराम, सीमा कांबळे, कुंदा फ़ूने ,अरविंद तुमडाम, सामुदायिक आरोग्य अधिकारी वैशाली तितरें,आरोग्य सेवक राजू उमाटे, आरोग्य सेविका जयश्री महादूले ,आशा वैशाली रघाटाटे ,शिक्षक राजेश मने, राजेश फटिंग, विशेष शिक्षक सौ बाजीराव ,केंद्र प्रमुख मंजिरी डुकरे, अंगणवाडी सेविका शोभा चीडाम ,ज्योत्स्ना तुमडाम , पोलीस पाटील अमोल कूड़मथे,तलाठी ठमके , बचत गटातील सदस्य नीना उईके,अर्चना चांभारे ,मदतनीस खाडे, मस्के, गावातील मान्यवर, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक कांबळे, सूरज भोंगाडे,नितेश डोळसकर ,राहुल डोळसकर यांची उपस्थिती होती. गावातील लोकासाठी पी एम सूर्य घर योजनेची यादी ची माहिती देण्यात आली.