कोटंबा येथे गावकऱ्यांनी उत्साहात केली शिव मंदिरात मूर्तीची स्थापना
प्रतिनिधी / सेलू :
कोटंबा येथे नव्याने बांधकाम केलेल्या शिव मंदिरात पुरातन मुर्तीची स्थापना करण्यात आली. कोटंबा गावात पुरातन छोटेसे शिव मंदिर होते. परंतु ते अडचणीत असल्यामुळे लोकाना अडचण होत होती.गावातील काही लोकांनी नविन मंदीर बांधून पुरातन मूर्ती सुशोभित करून त्याचीच स्थापना करायचा विचार सरपंच रेणुका कोटंबकर यांचेकडे मांडला. तेव्हा सौ. कोटांबकर यांनी हा चांगला प्रस्ताव असून मंदिर झाल्यास सौंदर्य वाढेल व लोकामध्ये एकात्मतेची भावना रुजेल महणून गावातील मुख्य जागेवर मंदिर बांधकामास परवानगी दिली. आणि यथोचित मदत केली. यानंतर माजी सरपंच शरद राऊत,शंकर वंदिले,अरुण कोटंबकर,सुरेश वांदिले,बापूराव वंदिले, प्रकाश कोटंबकर, गाठे,शंकर कोटंबकर, माधवराव कोटंबकर, रमेश धरमुळ,यांनी देवस्थान कमिटी स्थापना करून गावांतील नागरिकांनी व बाहेरील व्यक्तींनी देणगी दिली त्यातून मंदिराचे बांधकाम पूर्ण केले.आणि पुरातन मूर्ती सुशोभित करून आणि त्रिशूल ची स्थापना गावातील भजन मंडळींनी दिंडी काढून गावकऱ्यांनी उत्साहात करण्यात आली.या सर्व कार्यक्रमात सर्व गावकऱ्यांनी एकजुटत्तेने एकमेकाला सहकार्य करीत आनंदाने सहभाग घेतला.महिला, पुरुष, युवक युवती इत्यादि नी सहभाग घेतला.आणि गावकऱ्यांनी अन्नधान्य दान करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.