🔥कोटंबा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.🔥बदलाची सुरुवात स्वतःपासून करा, स्वतःच्या स्वप्नांना पंख द्या आणि निर्भयपणे जगाला सामोरे जा–रेणुका कोटंबकार.
सेलु -/ कोटंबा येथील अंगणवाडी मध्ये माजी सरपंच रेणुका कोटंबकार यांनी जागतिक महिला दिनाचे आयोजन केले होते. कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून रेणुका कोटंबकार माजी सरपंच तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सेलु, सामुदायिक आरोग्य अधिकारी वैशाली तितरे, मुख्याध्यापक प्रदीप आंबटकर, विशेष शिक्षिका सौ बाजीराव, बचत गट लेखापाल नीना उईके,अंगणवाडी सेविका शोभा चीडाम यांची उपस्थिती होती. प्रथम कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली. उपस्थित पाहुण्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन केले. वैशाली तीतरे यांनी आरोग्यविषयक माहिती दिली. माजी सरपंच रेणुका कोटंबकार यांनी महिलांनी महिलांचा सम्मान केले पाहिजे तथा स्वत आत्मनिर्भर व सक्षम बनवून आपल्या नवीन पिढी घडविली पाहिजे. आणि स्वतः च्या आनंदाला प्राथमिकता दिली पाहिजे. अंगणवाडी सेविका, यानी नृत्य सादर केले. मदतनीस, बचत गटातील महिलांनी गीत सादर केले.यांना बक्षीस देण्यात आले. रेणुका कोटंबकार यांच्या तर्फे गावातील आपआपल्या क्षेत्रात काम करणार्या महिला समुदायाला आरोग्य अधिकारी वैशाली तितरे ,अंगणवाडी सेविका शोभा चीडाम,ज्योत्स्ना तुमडाम,मदतनीस पूनम खाडे, वंदना भुसारी, आशा वैशाली रघाटाटे,संगणक चालीका सविता सरोकार, ग्रामसंघ प्रेरिका अर्चना चांभारे ,लेखापाल नीना उईके यांचा भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. समाजातील महिलांचे योगदान आणि त्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घेत रेणुका कोटंबकार यांच्या तर्फे सर्व महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमामुळे महिलांमध्ये एकजूट, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव वाढण्यास मदत झाली. कोटंबा गावात अशा प्रकारे जागतिक महिला दिन साजरा करून महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी गावातील, महिला, बचत गट सदस्य, किशोरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ज्योत्स्ना तुमडम आणि शोभा चीडाम यांनी उपस्थितांचे आभार मानले.