आकोली,सेलू -/ तालुक्यातील कोटंबा शिवारातील समुद्धी महामार्गावर दि२१च्या रात्री अनोळखी इसमाला अज्ञात वाहनाने चिरडले असुन त्याचे अंदाजे वय २५ ते ३० आहे त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असुन त्याचे अंगावर फक्त अंडरवेअर असुन हा व्यक्ती मनोरूग्ण असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या व्यक्तींला चिरडणाऱ्या वाहनांचा शोध लागलेला नसुन या प्रकरणाची नोंद सेलू पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली असून सेलु पोलिस स्टेशनचे पि एस आय प्रविण भोयर व पोलिस शिपाई मारोती किन्नाके अधिक तपास करीत आहे, सदर व्यक्ती बद्दल कोणाला माहिती असल्यास सेलू पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पि एस आय प्रविण भोयर यांनी केले आहे.