🔥हाच तो एपीआय मिलिंद पारडकर खाकीचा ‘अर्थ’पूर्ण बनाव! आर्णीत पोलीस-पत्रकार-दलाल यांचे अभद्र युती.
🔥हेच ते राजपूत हॉटेल.
🔥ललना पुरविणार्या ‘अलकाचा’ पोलीसांकडुन आता शोध पाच लाखाची डिल कि आणखी इटालीयन ललनाचे आमिष
यवतमाळ -/ लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवणारे काही भ्रष्ट पत्रकार आणि कायद्याचे रक्षक म्हणवणारे वर्दीतील ‘भक्षक’ एकत्र आले की समाजाचे कसे धिंडवडे निघतात, याचा जळजळीत नमुना आर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोनबेहळ येथे पाहायला मिळाला आहे. हरिओम बघेल नावाच्या पत्रकाराच्या ‘राजपूत हॉटेल’ या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी टाकलेली धाड ही कारवाई होती की केवळ ५ लाखांच्या वसुलीसाठी रचलेला ‘बनाव’, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. लोनबेहळ परिसरातील नांदेड राज्यमार्गावर असलेले ‘राजपूत हॉटेल’ गेल्या तीन वर्षांपासून अनैतिक कृत्यांचा अड्डा बनले होते. समोर चहा-नाश्त्याचा फलक आणि मागे चालणारा देहविक्रीचा काळा बाजार, हे समीकरण जिल्हाभरात चर्चेचा विषय होते. १००० रुपये प्रति तास या दराने येथे शरीरसुखाचा बाजार मांडला जात होता. धक्कादायक बाब म्हणजे, या कुंटणखान्यावर यवतमाळ आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील तब्बल २२ प्रतिष्ठित जोडपे, महाविद्यालयीन तरुण-तरुणी आणि एका बड्या लोकप्रतिनिधीची कन्या रंगेहाथ पकडली गेल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.
९ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांची क्राईम मीटिंग सुरू असताना, वरिष्ठ अधिकारी व्यस्त असल्याचा फायदा घेत API मिलिंद पारडकर आणि फॉरेन्सिक पथकाने या हॉटेलवर छापा टाकला. धाड पडताच हॉटेलमध्ये एकच खळबळ उडाली. २२ जोडपे आक्षेपार्ह अवस्थेत सापडले असताना, नियमानुसार PITA (Prevention of Immoral Traffic Act) अंतर्गत कठोर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, कायद्याचा बडगा उगारण्याऐवजी तिथे ‘वाटाघाटी’चा बाजार भरला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दारव्हा उपविभागातील पोलीस कर्मचारी श्रावण राऊत आणि आर्णीतील दोन मध्यस्थांच्या मदतीने हा संपूर्ण मामला ५ लाख रुपयांत दडपण्यात आला. रंगेहाथ पकडलेल्या त्या २२ जोडप्यांना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता मागच्या दाराने सोडून देण्यात आले. खाकी वर्दीने कर्तव्याला तिलांजली देत लक्ष्मीदर्शनापुढे गुडघे टेकले, हे आता स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणातील सर्वात संतापजनक पैलू म्हणजे, या अवैध व्यवसायाचा सूत्रधार हरिओम बघेल हा ‘दैनिक लोकमत’चा शहर प्रतिनिधी असल्याचे बोलले जात आहे. पत्रकारितेच्या नावाखाली अवैध धंद्यांना संरक्षण देण्याचे काम येथे उघडपणे सुरू होते. एका नामांकित वृत्तपत्राचे नाव वापरून पोलीस प्रशासनावर दबाव टाकणे आणि आर्णी ठाणेदाराच्या मूक संमतीने हा ‘गोरखधंदा’ चालवणे, यातून पत्रकारितेची प्रतिमा मलिन झाली आहे. याला राजकीय वरदहस्त आणि काही सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे पाठबळ लाभल्यामुळेच तीन वर्षांपासून हा व्यवसाय बिनदिक्कत सुरू होता.
PITA कायद्यानुसार कारवाई करण्याचे अधिकार SDPO किंवा PI दर्जाच्या अधिकाऱ्याला असतात. मग API मिलिंद पारडकर यांनी वरिष्ठांना अंधारात ठेवून ही ‘खाजगी’ मोहीम कोणाच्या सांगण्यावरून राबवली? २२ जोडपे सापडल्यानंतरही पोलीस रेकॉर्डवर एकाचीही नोंद का नाही? फॉरेन्सिक टीम सोबत असताना पंचनामा का करण्यात आला नाही? पोलीस स्टेशनचा कर्मचारी जेव्हा सेटलमेंट करण्यासाठी मध्यस्थी करतो, तेव्हा तो विभागाचा शिस्तभंग नाही का?
अलकाचा शोध आणि ‘साहसिक’चा पर्दाफाश!
या कुंटणखान्यावर ललना पुरविणारी अलका नावाची महिला सध्या पोलिसांच्या रडारवर असल्याचे भासवले जात आहे. मात्र, मूळ सूत्रधार मोकाट असताना केवळ एका दलाल महिलेचा शोध घेणे ही निव्वळ धूळफेक आहे. ‘साहसिक’ या माध्यमाच्या पुढाकारामुळे हा ५ लाखांच्या सेटलमेंटचा प्रकार उजेडात आला आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन API पारडकर, कर्मचारी श्रावण राऊत आणि या बनावट कारवाईत सामील असलेल्या सर्वांची उच्चस्तरीय चौकशी करणे गरजेचे आहे. जर कायद्याचे रक्षकच ५ लाखांसाठी कुंटणखाना चालवणाऱ्यांना अभय देत असतील, तर सामान्य जनतेने कोणाकडे दाद मागावी? राजपूत हॉटेलच्या नावाखाली सुरू असलेला हा ‘नंगा नाच’ कायमचा बंद करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
या प्रकरणातील दोषींवर निलंबनाची कारवाई होणार की हे प्रकरणही पैशाच्या जोरावर दाबले जाणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)