वर्धा -/ अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे २ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राजमाता अहिल्यादेवी होळकर सामाजिक संस्था द्वारा आयोजित सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक राजू गोरडे त्याचप्रमाणे संस्थेचे राजू बानमारे यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाचे स्थळ सुसंस्कार मंदिर सभागृह गुरुदेव मंदिर मोझरी येथे घेण्यात आला.यावेळी अमरावती जिल्ह्यातील वर्धा जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी वर्धा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रबोधनकार पद्माकर कांबळे यांचा सत्कार महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री महादेवराव जानकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ शाल श्रीफळ,संत तुकडोजी महाराज गुरुदेव सेवा मंडळाची टोपी परिधान करून, व सन्मानचिन्ह, व संस्थेचे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.त्याच प्रमाणे वर्धा चे ज्येष्ठ साहित्यिक मा.इमरान राही, देवळी येथील ज्येष्ठ समाज सेवक मोहनबाबु अग्रवाल,तिवसाचे अशोक देशमुख,कैशिक शेख अकोला,दत्ता मेश्राम,डॉ मेश्राम,राजू भगत यांच्या ही सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी अमरावती जिल्ह्यातील वर्धा जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील काम करणारे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.