वर्धा -/ देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात ज्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली असे अनेक वीरपुत्र या वर्धा नगरीने देशासाठी अर्पण केले. जीवनात जगण्याचे परम साध्य निश्चित करून नैतिक मार्गाने ते गाठण्याचा प्रयत्न करणे ही आपली संस्कृती आहे. या जीवनमार्गात, कठोर परिश्रम, सातत्य आशावाद यांचे अनुसरण करून सामजिक उन्नती व उत्थानाचे होणारे कार्य नेहमीच प्रेरणादायी ठरणारी बाब आहे. विविध क्षेत्रात आपल्या कार्य कर्तुत्वाने प्रगतीची उंची गाठणारे येथील सत्कारमूर्ती मान्यवर एक प्रेरक नव्हे तर त्या त्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी एक मार्गदर्शक दीपस्तंभ ठरावा, असे व्यक्तिमत्व आहे. असे प्रतिपादन वर्धेचे खासदार अमर काळे यांनी व्यक्त केले.ते 21 ऑगस्ट रोजी सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालय सभागृहात स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वर्धा जिल्हा गौरव पुरस्कार सोहळ्या निमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवी मोहनबाबू अग्रवाल यांनी केले. तर अतिथी म्हणून वरोरा येथील आनंदवन संस्थेचे विश्वस्त सुधाकर कडू, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे अध्यक्ष परमानंद तापडिया, रंगभूमी प्रयोग परी निरीक्षण मंडळ महाराष्ट्र राज्याचे सदस्य डॉ. रमेश थोरात, नवशितिज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष सुनील कुमरे, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, निम्न वर्धा प्रकल्पाचे उप कार्यकारी अभियंता अमोल आठवले, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष पवन तिजारे, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मोहन मोहिते, स्पोर्ट कराटे असोसिएशनचे संरक्षक इमरान राही, अध्यक्ष सतीश ईखार, प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.पाहुण्यांच्या हस्ते सत्कारमूर्तीचे शॉल, श्रीफळ पुष्पगुच्छ, वृक्ष व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. या सोहळ्यात सत्कारमूर्ती म्हणून डॉ. इंद्रजीत खांडेकर, डॉ. प्रदीप कश्यप, डॉ. राजेंद्र गंजीवाले, संतोष शेगावकर, डॉ. किरण नागतोडे, अविनाश काकडे, गजानन कुबडे, निरंजन वरभे, मुस्तफा बख्श, चेतनबाबू अग्रवाल, सुप्रिया घडे, डॉ. अभय मोहिते, दिलीप रोकडे, डॉ. विद्या कळसाईत, संध्या सायंकार, रवि काकडे, ज्ञानेश्वर हिवसे, प्रतीक सूर्यवंशी, अश्विनी काकडे, सरला चापडे, पुष्पा तपासे हे सर्व सत्कारमूर्ती उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रास्तावना इमरान राही, संचालन सौ. कल्याणी मंगेश भोंगाडे, तर आभार मोहन मोहिते यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आयोजन समितीचे गंगाधर पाटील, भगवानदास आहुजा, श्याम पठवा, विलास कुलकर्णी, प्रवीण पेठे, हरीश पाटील, प्रकाश खंडार, संतोष सेलुकर, विजय सत्याम, निखिल सातपुते, सुनील चंदनखेडे, खेमराज ढोबळे, सचिन झाडे, उमेश चौधरी, हेमलता काळबांडे, पूजा गोसटकर, पियुष हावलादर, भार्गव खेवले, रुजान बाघमोरे, पलक लक्षणे व मुख्य आयोजक मंगेश भोंगाडे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शहरातील अनेक गणमान्य मान्यवर मोठ्या संख्येत कार्यक्रमाला उपस्थित होते.