ग्रामपंचायत सोरटा येथे बंधीस्थ नाली बांधकामाचे भूमिपूजन
प्रतिनिधी / वर्धा :
ग्रामपंचायत सोरटा येथे बंधीस्थ सिमेंट नाली बांधकाम करिता प्रहारच्या रसुलाबाद सर्कल च्या पंचायत समिती सदस्या अरुणा सावरकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सोरटा सरपंच महेंद्र मानकर, उपसरपंच मंगेश मानकर, चंदा मलीये , दीपक देवगडे, विद्या सैय्याम यासह गावातील नागरिक उपस्थित होते.