🔥व्हॉईस ऑफ मीडियाच्या नूतन पदाधिकारी,शिर्डी शिलेदारांचा गौरव,कार्यशाळेच्या माध्यमातून संघटनात्मक धडे.🔥प्रकाश पोहरे,मंगेश चिवटे,रामेश्वर नाईक,यांची उपस्थिती.
वर्धा -/ चांगल्या पत्रकारितेमुळे सामाजिक स्तर कायम आहे.हा स्तर अधिक उंचावला जावा यासाठी राज्यातील पत्रकारिता सदैव अग्रेसर आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या,उद्योजक राजश्री पाटील यांनी केले.राज्यभरामधल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून निवडणुका होऊन त्यामध्ये निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार,शिर्डी येथे राज्य शिखर अधिवेशन यशस्वी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि संघटनात्मक बांधण्यासाठी एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या एक दिवशीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना राजश्री पाटील बोलत होत्या.विचारपीठावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे,मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे,मंत्रालयातील विधी विभागाच्या आरोग्य विभागाचे प्रमुख रामेश्वर नाईक,संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांची यावेळी उपस्थिती होती.कोणत्याही संस्थेचा, संघटनेचा पदाधिकारी संघटनात्मक बांधणीमध्ये परिपूर्ण असणे आवश्यक आहे.सकारात्मकता,कार्यशीलता, एकसंघता या सगळ्या विषयांना घेऊन चालणाऱ्या प्रत्येक संस्थेमध्ये चांगुलपणाचे वारे नेहमी वाहत असते, याचे अनेक दाखले यावेळी राजश्री पाटील यांनी दिले.चौथास्तंभ आहे म्हणून सामाजिक स्तर व्यवस्थित आहे.जितकी सखोल पत्रकारिता होईल,जितकी डोळसपणे पत्रकारिता होईल,तेवढे सामाजिक स्वास्थ्य टिकून राहील.सखोल आणि डोळसपणे पत्रकारिता राहण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया सारखी संस्था पुढाकार घेते याचा आम्हा सगळ्यांना अभिमान वाटतो,असेही राजश्री पाटील यावेळी म्हणाल्या.आजही ग्रामीण पत्रकार तळागाळातून बातम्या देत पत्रकारितेमधली योग्य ती भूमिका पार पडतो.या भूमिकेमध्ये त्याला कित्येक वेळा अपयश येते,पण तो आपली जिद्द सोडत नाही.या पत्रकारितेची चळवळ जिवंत ठेवणाऱ्या पत्रकारांचा उत्साह सर्वांनी वाढवला पाहिजे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’सारखी संस्था यासाठी पुढाकार घेते हे अभिमानस्पद आहे.यावेळी मंगेश चिवटे, रामेश्वर नाईक, यांचीही भाषणे झाली. शिर्डी येथील शिखर अधिवेशन यशस्वी करणारे नगरचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.राज्यात निवडणुका घेऊन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने मोठा पायंडा पाडला आहे. यात दुसऱ्यांदा विजयी झालेल्या अनिल म्हस्के (प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र), योगेंद्र दोरकर (राज्य कार्याध्यक्ष), दिगंबर महाले (राज्य सरचिटणीस), मंगेश खाटीक (राज्य कार्याध्यक्ष, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र विभाग), विजय चोरडिया (राज्य कार्याध्यक्ष मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभाग), अजित कुंकूलोळ (राज्य उपाध्यक्ष), संजय पडोळे (राज्य उपाध्यक्ष), सतीश रेंगे पाटील (मराठवाडा विभागीय अध्यक्ष), किशोर कारंजेकर (विदर्भ विभागीय अध्यक्ष), सचिन मोहिते (पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष), मिलिंद टोके (उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष), अरुण ठोंबरे (मुंबई कोकण विभागीय अध्यक्ष), अमर चोंदे (राज्य कार्यवाहक), रोहित जाधव (प्रदेशाध्यक्ष,व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग महाराष्ट्र), वामन पाठक (प्रदेश सरचिटणीस, व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक महाराष्ट्र), अब्दुल कय्यूम अब्दुल रशीद (प्रदेश कार्याध्यक्ष,व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग,महाराष्ट्र) यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्यातून सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.