जल्लोष बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन…..

0

🔥देवळी येथे ४ मे ला होणार रंगारंग कार्यक्रम.

देवळी -/ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती व महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६९ व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब जयंती उत्सव समिती देवळी द्वारा आयोजित जल्लोष बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम ४ मे रोजी वेळ सायंकाळी सहा वाजता संविधान चौक परिसर देवळी येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस राहणार आहे विशेष अतिथी म्हणून आमदार राजेश बकाने तर मुख्य अतिथी म्हणून ऍड.विकास साठे मुंबई हायकोर्ट यांची उपस्थिती राहणार आहे.प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार समर्थ क्षीरसागर उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल चव्हाण,पीएसआय अश्विन गजभिये, माजी नगराध्यक्ष शोभा तडस,भाजपा शहराध्यक्ष उमेश कामडी,ज्येष्ठ समाजसेवक दादाराव मून,माजी नगरसेवक रितेश लोखंडे,भाजपा महिला आघाडी शुभांगी पुर्जेकर,आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहे.
जल्लोष बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम रविष इंटरटेनमेंट नागपूर द्वारा प्रस्तुत होणार आहे.यामध्ये महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक शिलवंत सोनटक्के, मनवर ठोसर,पी कुमार आणि श्रद्धा हे प्रख्यात गायक आपल्या कार्यक्रमाची प्रस्तुती देणार आहे. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी रितेश लोखंडे,भीमजय म्हैसकार,दिनेश भगत,सम्राट भगत,अवधूत बेंदले, प्रीतम डंबारे,प्रशिक कांबळे,धीरज मून, अनिकेत गाडगे,संदेश भगत,सुरज मून, समयक भोंगाडे, अनिकेत लोखंडे, कुणाल कांबळे,क्रिश म्हैसकार,आयुष कांबळे,आदर्श ससे, अंशू वानखेडे, रोशन भगत, ईशांत मून, सार्थक फुलझले, श्रेयश वरके, अथर्व गाडगे, अभय ताकसांडे इत्यादी कार्यकर्ते प्रयत्न करणार आहेत.

सागर झोरे साहसिक News-/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!