देवळी -/स्वजागृती शिवाय आत्मउन्नती होऊ शकत नाही, जीवनाला खुशहाल बनवायची असेल तर जीवरूपी मोबाईल मधे सुख,शांति, आनंद,प्रेम,ज्ञान,शक्ति,पवित्रता या 7 गुनांच्या ऐप्प ची नितांत गरज आहे असे व्यक्तव्य माउंट आबू वरुण आलेल्या ब्रह्माकुमारी इंद्रा दिदि यांनी 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9.00 वाजता श्याम सुंदर मन्नालाल अग्रवाल धर्म धर्मशाळा, देवळी येथे तीन दिवसीय “खुशनुमा जिंदगी” या कार्यक्रमामध्ये केले.या कार्यक्रमाला माजी खासदार रामदासजी तडस,जेष्ठ समाज सेवक मोहन बाबूजी अग्रवाल,माजी नगराध्यक्ष सुचिता मडावी,माजी उप नगराध्यक्ष नरेंद्र मदनकर,महेश अग्रवाल,वर्धा ब्रह्माकुमारिज सेवाकेंद्र संचालिका माधुरी दिदि,देवळी सेवाकेंद्र संचालिका ममता दिदि इत्यादि उपस्तित होते.कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्ज्वलनाने झाली.यावेळी बोलताना माजी खा. रामदसजी तडस म्हणाले की,आज समाजाला ज्या गोष्टिची आवश्यकता आहे ते कार्य ब्रह्माकुमारिज विद्यालया द्वारे होत आहे. तसेच जेष्ठ समाज सेवक मोहन बाबूजी अग्रवालजी म्हणाले की,आपली प्रकृति बिघडली तर आपण डॉक्टर कड़े जातो, इनकम बिघडले तर सी. ए. कडे जातो, कुठली चूक झाली ती दुरुस्त करण्याकरिता वकील कडे जातो परंतु मन बिघडले तर कुठे जायच याकारिता आजच्या कार्यक्रमाची आवश्यकता आहे.ब्रह्माकुमारी माधुरी दिदि यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले तर ममता दीदी यांनी शब्द सुमनानी स्वागत करुन विद्यालयाचा परिचय दिला. कुमारी स्नेहल हिने सुंदर नृत्य प्रस्तुत केले. पुढे दोन दिवस चालण्यार्या या कार्यक्रमाचा सर्व देवळी नगर वासियानी लाभ घ्यावा असे ममता दिदि यांनी निवेदन केले.