वर्धा -/केंद्रीय विद्यालय, वर्धा येथील पाचवीतील विद्यार्थी तनिष्क श्रीकांत जांभुळकर याची नवोदय विद्यालयात निवड झाली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या नवोदय प्रवेश परीक्षेत त्याने गुणवत्ता यादीत वर्धा जिल्ह्यातून पाचवे स्थान मिळविले. तनिष्कची २०२६-२७;या शैक्षणिक वर्षासाठी जवाहर नवोदय विद्यालय सेलू (काटे) येथे निवड झाली आहे.
त्याने आपल्या यशाचे श्रेय वडील श्रीकांत जांभुळकर, आई कांचन जांभुळकर, आजी -आजोबा, यांच्यासह पूजा बकाले मॅडम यांना दिले. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल सर्व स्तरावरून त्याचे कौतुक करण्यात येत आहे.