तिवसा येथे ग्रामजयंती महोत्सव उत्साहात हजारो लोकांची उपस्थिती….
क्रांतीनायक महानाट्याचे आयोजन.
वर्धा / राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्याच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ११५ ग्रामजयंती महोत्सव स्व.आनंदराव पाटील माध्यमिक विद्यालय तिवसा येथे तालुकास्तरीय सामुदायिक प्रार्थना सर्वधर्म सम्मेलन व लेखक पुरुषोत्तम मिराशी लिखित, निर्मिती अमित कुबडे,दिग्दर्शक विलास कुबडे,निर्मिती सहाय्यक वामन काचोळे, संगीत वीरेंद्र लाटनकर,रंगभूमी नागपुर निर्मित राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवन चरीत्रावर आधारित महानाट्य क्रांतीनायक या महानाट्याचा ५२वा प्रयोग तिवसा येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष डॉ. रघुनाथ वाडेकर,उद्घघाटक दर्यापुर मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडे,स्वागताध्यक्ष माजी नगराध्यक्ष नगरसेवक वैभव वानखडे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी नगराध्यक्ष योगेश वानखडे,पंचायत समिती सभापती कल्पना दिवे,उपसभापती रोशनी पुनसे, उपाध्यक्ष न. प. तिवसा प्रिया विघ्ने,माजी जिल्हा परिषद सभापती दिलीप काळबांडे, अमरावती जिल्हा सचिव काँग्रेस कमिटी मुकुंद देशमुख, तिवसा शहर अध्यक्ष काँग्रेस सेतु देशमुख, रुपाली काळे, सुरेश मेटकर अध्यक्ष खरेदी विक्री संघ, रविंद्र राऊत सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तिवसा, तसेच सर्वधर्म प्रतिनिधी बुद्ध धर्म भदंत सत्यानंद महाथेरो,जैन धर्म सचिन नागमोते,ख्रिचन धर्म फादर बेजामिन हेरो, शिख धर्म गुरुदेवसिंग बावरी, मुस्लिम धर्म शफीक शहा व तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,नगरसेवक, नगरसेविका,सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील,सामाजिक कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चेतन परळीकर तसेच प्रास्तविक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष,नगरसेवक अमर वानखडे व आभार सचिव हेमंत टाले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेकडो लोकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंचच्या पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले.
गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज /24 वर्धा
.
