वर्धा -/येथे सन सिक्युरिटी कंपनी कडून जानेवारी महिन्यापासून ईगल इन्फा प्रा. लि. या कंपनीमध्ये सन सिक्युरिटी कंपनी दिल्ली कडून सेक्युरिटी गार्ड कामावर होते. मात्र, पहिला महिना ईगल कंपनी व सन कंपनी कडून व्यवस्थित पगार देण्यात आला होता. येळकेली पॉईंट वगळता बाकी पॉईंटवर रात्री पाळी करिता गार्ड लावन्यात आले होते. परिसरातील बराचसा भाग जंगली असल्यामुळे हिंस्र प्राण्यांची भीती असूनही पोटासाठी धोकादायक परिसरात १२तास काम करून कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापासून मोबदला मिळाला नसल्यामुळे अखेर काम बंद करावे लागले. मोबदला मिळाला नसल्याने आर्थिक परिस्थिती ढासळली, उपासमारीची वेळ आली. सन सिक्युरिटी कंपनीचे मालक उद्याला पगार करतो या आश्वासनाने ‘तारीख पे तारीख ‘ देत आठवडा निघून गेला. पण कर्मचाऱ्यांचे पगार झालेच नाही. सन कंपनी तसेच ईगल कंपनीकडून उडवा उडवी चे उत्तर मिळत होते. तुम्ही जर कामावर आले नाही तर तुम्हाला तुमचा पगार मिळणार नाही अशा धमक्या सुद्धा देण्यात आल्या मात्र शेवटी कामावर यायला पैसे नसल्यामुळे काम बंद करून दाद मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, कामगार कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून न्याय मीळण्यासाठी निवेदन देण्यात आली.सर्व कर्मचाऱ्यांचा पगार मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.