दररोज उशिरा येणाऱ्या लालपरीला अंतोरा गावातील शालेय विध्यार्थी कंटाळले….

0

🔥पालकांसह विध्यार्थी आंदोलन छेडण्याच्या तयारीत….

आष्टी शहीद -/ तालुक्यातील अंतोरा, चिंचोली, लहानआर्वी यां मार्गांवर धावणारी लालपरी दररोज उशिरा येत असल्यामुळे शालेय विध्यार्थी आक्रमक झाले.पालकांनी विध्यार्थी यांना घेऊन आता आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
आष्टी तालुक्यातील अंतोरा गावातील मुले मुली हे आष्टी येथे शिक्षण घेण्यासाठी रोज शाळेत जातात. रोज वेळेवर येणारी लालपरी गेल्या आठ दिवसापासून तब्बल दोन तास उशिरा अंतोरा बस स्टॅन्ड वर येते आणि आष्टी येथे १२. ३०वाजता पोहचते. रोज उशिरा लालपरी आल्याने विध्यार्थी यांचे दोन पिरेड निघून जाते यामुळे विध्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होते. रोज उशिरा येणाऱ्या लालपरी ला आता विध्यार्थी यांच्यासाह पालक वैतागले आहे. दि. २३रोजी विध्यार्थी यांच्या सह पालक संताप व्यक्त करित बस स्टॅन्ड परिसरात दिसून येत होते. बस वेळेवर यावी म्हणून वेळोवेळी निवेदन दिले तरी मात्र दुर्लक्ष होत आहे.

(🔥शेख नासीर शेख बशीर माजी उपसरपंच अंतोरा)
शाळेतील विध्यार्थी यांना घेऊन जाण्यासाठी रोज येणारी लालपरी गेल्या आठ दिवसापासून तब्बल दोन तास उशिरा अंतोरा बस स्टॅन्ड येते. उशिरा येणाऱ्या लाल्परीला आता विध्यार्थी वैतागले असून विध्यार्थी यांच्या सह गावकरी आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे.निवेदन देऊन कार्यवाही होत नसेल तर चक्का जाम आंदोलन करावे लागेल.

नरेश भार्गव साहसिक news -/24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!