🔥दारू पिऊन दारूच्या नशेत मोटार सायकल चालवीणारे चालकावर वाहतूक पोलिसांची कार्यवाही गुन्हा दाखल करून वाहन केले जप्त.
वर्धा -/ येथील दि. 26/02/26 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल सर यांच्या आदेशानवये वाहतूक पोलिसांची निर्मल बेकरी चौकात वाहन चेकिंग नाकाबंदी हि नेमण्यात आलेली होती तेव्हा एक मोटार सायकल चालक हा निर्मल बेकरी चौकात अतिवेगाने व अनियंत्रितपणे वाहन चालवीतना वाहतूक पोलीस अंमलदार यांना दिसून आला तो आपले वाहन व्यवस्थित चालवू शेकत नव्हता त्यावरून वाहतूक अंमलदार यांनी त्याचे जवळ जाऊन त्याचे नाव गाव विचारले असता तो दारूच्या नशेमध्ये बडबड करू लागला त्याचे तोंडाचा दारू पिल्याचा आंबट उग्रट वास येत होता त्यावरून त्याची मेडिकल तपासनी केली असता तो हिरो होंडा मोटार सायकल नंबर mh 32 f 4245चालक यास त्याचे नावं विचारले असता त्याने आपले नावं वैभव गजानन श्रीरामे वय 35 वर्ष रा कुरझडी जामठा वर्धा याची मेडिकल तपासनी केली असता तो दारूच्या आमलाखाली असल्याचे व त्याचे रक्तात 130 mg अल्कोहोल चे प्रमाण मिळून आल्याने सदर वाहन चालका विरुद्ध पो. स्टे. वर्धा शहर येथे मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये गुन्हा नोंद करून चालक यास अटक करून त्याची मोटार सायकल हि जप्त करण्यात आली आहे,
सदर कार्यवाही वाहतूक शाखेचे Asi संजय भांडेकर
पो. हवा. प्रदीप कोहळे
महिला अंमलदार दर्शना वानखेडे . वैशाली लेंडे यांनी संद्याकाळी 6/00 वा निर्मल बेकरी चौकात केली आहे,
तरी होळी रंगपंचमी सण उत्सव मध्येही कोणीही वाहन चालक यांनी हि आपली वाहने दारू पिऊन चालवू नये असे आवाहान पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी सर्व चालकाना केलेले आहे,