दिवाळी मिलन व वस्त्र वितरण सोहळा
प्रतिनिधी / वर्धा :
मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीने अनेक क्षेत्रावर विपरीत परिणाम झाले एवढेच नव्हे तर अनेक कुटुंबीयांची वाताहत झाली अनेकांच्या माता – पित्यांना या महामारी ने हिरावून नेले व मुलेबाळे पोरके आणि अनाथ सुद्धा झाले. शासकीय स्थरावरून कोरोनाच्या काळात अनेक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरीही ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात यापासून वंचित राहिला अशा वेळी सामाजिक संस्थांनी सामाजिक दायित्वांचे भान राखून ग्रामीण क्षेत्रातील गरजू जनतेला आवश्यक मार्गदर्शन व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन निम्न वर्धा प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता इरफान शेख यांनी व्यक्त केले. ते १७ नोव्हेंबर रोजी ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरम व स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा द्वारा आयोजित दिवाळी मिलन व वस्त्र वितरण सोहळ्याप्रसंगी त्रिरत्न बुद्ध विहार सिद्धार्थ नगर बोरगाव (मेघे) वर्धा येथे आयोजित कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद सदस्य पंकज सायंकार, तर प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरम चे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही, माजी सरपंच देवानंद दखणे, ग्रामपंचायत सदस्य युनूस पठाण, साधना वासनिक, ज्येष्ठ समाजसेवक विजय नाखले, अभियंता पुरुषोत्तम मानमोडे, स्पोर्ट कराटे असो. चे कोषाध्यक्ष विजय सत्याम , मुस्कान इरफान शेख, सुनील चंदनखेडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी इमरान राही म्हणाले ग्रामीण भागात सामाजिक उपक्रम आपल्या क्षेत्रात आयोजित व्हावे ही प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांची अभिलाषा असते मात्र यासाठी येथे ज्या संस्थांनी हा सामाजिक उपक्रम घडवून आणला त्यांच्या सहकार्याबद्दल जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
सर्व पाहुण्यांच्या शुभहस्ते ५५ ते ६० गरजू मुला,मुलींना नवीन वस्त्र (ड्रेस) देण्यात आले,
कार्यक्रमाचे आयोजन युवा सामाजिक कार्यकर्ते मंगेश भोंगाडे यांनी केले. संचालन फिजा खान तर आभार पूजा गोसटकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्रांती पुणेकर, दिलावर शाहा, प्रवीण कांबळे, ज्ञानेश्वर मारबते, श्रीनिवास एनिकला रेड्डी, संगीता वाघमारे, बेबी म्हैसकर, पुष्पा वनकर, रविंद्र मसराम, मिलिंद आडे, मनीषा राठोड, इंद्रेश राखुंडे, समीर झाेटिंग, सुशांत जिवतोडे, कवीश ठोंबरे, भावेश गोटे, वृजान बागमोरे यांनी परिश्रम घेतले.