दुचाकी वाहनाने देशी दारूची तस्करी…..

0

🔥93 हजारांचा मुद्देमाल जप्त.🔥एकाला बेड्या तर मुख्य आरोपी दारू विक्रेता हरी घंगारे फरार.

सिंदी (रेल्वे) -/ लगतच्या नागपूर जिल्ह्यातून देशी दारू खरेदी करून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दुचाकी वाहनाने अवैद्यरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपींवर सिंदी पोलिसांनी हेलोडी-सिंदी मार्गावर नाकाबंदी करून कारवाई केली. या कारवाईत एकूण 93 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी नेहुल राजू बेलखोडे वय वर्ष 23 वर्ष राहणार सोनामाता मंदिर पिपरा रोड सिंदी (रेल्वे) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून मुख्य आरोपी दारू विक्रेता हरी घंगारे राहणार सोनामाता नगर पिपरा रोड सिंदी (रेल्वे) ता. सेलू जिल्हा वर्धा हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सिंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दिनांक 10/10/2024 रोजी त्यांना खास मुखबिरकडुन गोपनीय माहीती मिळाळी की, हरीदास घंगारे हा त्याचे मोपेडे ऍक्टिव्हा दुचाकी वाहनाने त्याचा नौकर नेमेश उर्फ नेहुल बेलखोडे याच्या मदतीने नागपूर जिल्ह्यातून देशी दारूचा माल घेवुन बोरगाव ( बेलोडी ) गावाचे रस्त्याने रेल्वे पुलाचे खालुन हेलोडी मार्गे सिंदी रेल्वे शहरात येणार आहे, अशी माहीती सिंदी पोलिसांना प्राप्त झाल्याने हेलोडी-सिंदी मार्गावर नाकाबंदी करून प्रोव्हीशन रेड केला असता आरोपी दारू विक्रेता हरीदास घंगारे हा मौक्यावरून पसार झाला. आरोपी नेमेश उर्फ नेहुल राजु बेलखोडे वय 23 वर्ष रा. सोनामाता नगर पिपरा रोड सिंदी (रेल्वे) ता. सेलू जिल्हा वर्धा याचे ताब्यातुन एक जुनी वापरती होंडा कंपनिची ऍक्टिव्हा मोपेड डार्क ब्लु रंगाची दुचाकी क्रमांक एम.एच. 32-ए.वी. 3085 किंमत अंदाजे 75,000 रुपये, एका मोठ्या पिशवीत लहान मोठया तिन खरड्याच्या खोक्यात 180 एम.एलच्या काचेच्या सिलबंद देशी दारूने भरून असलेल्या संत्रा लावणी कंपनिच्या एकुण 120 शिश्या प्रति नग 150 रुपये प्रमाणे 18,000 रुपये असा एकुण 93,000 रुपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने पंचनामा कार्यवाही करून आरोपी हरी नागोराव घंगारे व नेमेश उर्फ नेहुल राजू बेलखोडे यांच्या विरुद्ध कलम 65 अ, ई, 77 अ, 83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा सहकलम 3 (1) 181, 130 / 177 मोटार वाहण कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, प्रमोद मकेश्वर यांचे विशेष मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरिक्षक संतोष दरेकर पो. स्टे सिंदी रेल्वे यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार प्रफुल डफ, आनंद भस्मे, कांचन चाफले, नितीन नखाते, उमेश खामनकर संदेश सयाम, समीर आगे, सचिन उईके तसेच सर्व नेमणुक पो.स्टे. सिंदी रेल्वे यांनी केलेली आहे.

दिनेश घोडमारे साहसिक news 24 सिंदी रेल्वे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!