देवळी येथे दुय्यम निबंधक व अर्जनविस यांना लाच घेताना पकडले…..

0

शेती विक्री करिता दहा हजाराची मागणी आठ हजारात झाली तडजोड..

देवळी / शेतजमिनीच्या विक्रीपत्राची नोंदणी करून देण्यासाठी लाचखोर दुय्यम निबंधक कैलास शंकर गाढे वय ५५ वर्ष रा. लक्ष्मीनगर, वर्धा) याने अर्जनवीस स्वप्नील ज्ञानेश्वर इंगोले (वय ३५ वर्ष रा. देवळी) याच्यामार्फतीने तक्रारदाराकडून आठ हजारांची रक्कम स्वीकारताना दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले.ही कारवाई २३ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देवळी येथे कारवाई करण्यात आली. तक्रारदाराला तालुक्यातील मिर्झापूर परिसरातील शेतजमीन खरेदी करायची असल्याने खसरा क्रमांक ३४ आराजी १.०२ हेक्टर आर जमिनीच्या विक्रीपत्राची नोंदणी करायची होती.मात्र, लाचखोर दुय्यम निबंधक कैलास गाढे याने विक्रीपत्राची नोंदणी करण्यासाठी तक्रारदाराला १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती आठ हजार रुपयांची लाच अर्जनवीस स्वप्नील ज्ञानेश्वर इंगोले याच्याकडून स्वीकारली.दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघांना रंगेहाथ पकडून अटक केली.दोघांविरुद्ध देवळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रीती शेंडे,नीलेश उरकुडे,हरीष गांजरे,दीपाली भगत, हर्षलता भरडकर यांनी केली.पुढील तपास सुरू असून या प्रकरणांमध्ये देवळी तहसीलतील अर्जनवीस यांना माहिती घेण्याकरिता बोलाविण्यात आल्याचे समजते या प्रकरणी अर्जनविसांची मालमत्तेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे विश्वेशनीय माहिती समोर आली आहे. शेताची खरेदी विक्री मालमत्ता प्रॉपर्टी खरेदी विक्री करावयाची असल्यास मोठ्या प्रमाणामध्ये नेहमी लाच मागण्यात येत असल्याचे सर्वत्र चर्चा आहे.याप्रकरणी तपासात काय पुढे येते याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

सागर झोरे साहसिक न्यूज /24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!