देवळीच्या भ्रष्ट वाहतूक पोलिसावर केव्हा होणार कायदेशीर कारवाई…

0

🔥देवळीच्या भ्रष्ट वाहतूक पोलिसावर केव्हा होणार कायदेशीर कारवाई.

🔥हीच ती ऑन कॅमेरा मध्ये शेतकऱ्यांनी दिलेली पत्रकारांशी दिलेली मुलाखत.

🔥हीच ती शेतकऱ्याची कापूस भरून असलेली गाडी मालकाकडून वाहतूक पोलीस यांनी अवैध वसुली घेतली पण पावती नाही दिली.

🔥भ्रष्ट वाहतूक पोलिसावर कारवाई करा देवळीकर जनतेची मागणी.

देवळी -/ शहरात गाजत असलेले वाहतूक पोलिसाचे अवैध वसुली प्रकरण थांबायचं नाव घेत नाही तर लोकांकडून त्यांच्या नवीन नवीन व अवैध वसुलीची प्रकरणे बाहेर येत आहे.या वाहतूक पोलिसांमुळे देवळीचे सिटर ऑटो चालक त्रस्त झालेले आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हा वाहतूक पोलीस साप्ताहिक व महिन्याप्रमाणे अवैध वसुली करतो आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर अनेक ऑटो चालकांनी त्याचे अवैध वसुलीचे प्रकरण प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलून दाखवलेले आहे. ऑटोच नाहीतर दुचाकी,व चारचाकी वाहन चालकांना याचा मोठा अवैध वसुलीचा त्रास आहे.त्यामुळे शाळेकरी विद्यार्थ्यांना सोडणारे पालक यांच्याकडूनही हा वाहतूक पोलीस जबरीने वर्दीचा धाक दाखवून अवैध वसुली करतो.हा वाहतूक पोलीस यशोदा नदीच्या पुलाजवळ व दिघीच्या उडान पुलाखाली,तसेच पेट्रोल पंप च्या उडान पुलाखाली हा वाहतूक पोलीस ठिय्या मांडून सर्वाच प्रकारच्या वाहनांना थांबवून त्यांच्याकडून अवैध वसुली करतो असा धक्कादायक खुलासा प्रत्यक्ष दर्शीने केला आहे.(हा वाहतूक पोलीस वर्दीला नेम प्लेट न लावता)सायंकाळी अवैध दारू विक्रेत्यांकडून सुद्धा वसुली करतो त्याच्या या खुलेआम अवैध वसुलीला देवळी पुलगाव उपविभागीय अधिकारी चौकशी करून कारवाई करणार का? असा सवाल आता देवळीकर नागरिक विचारत आहे.असा भ्रष्ट अवैध वसुली करणाऱ्या वाहतूक पोलिसांवर कायदेशीर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी समाजाच्या प्रत्येक स्तरातून होत आहे.(क्रमशः)

            सागर झोरे                         साहसिक News-/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!