देवळी -/ शहरातील वाहतूक पोलीस याने देवळी येथे शेतकरी बाहेरून येणाऱ्या मालवाहू कापसाच्या गाडीला थांबवून कोणताही गुन्हा नसतांना व पावती न देता दोनशे रुपये घेऊन अवैध वसुली चा कुप्रकार देवळी येथील वाहतूक पोलिसांनी बेभानपणे सुरू असल्याचे शेतकरी बांधवांच्या चर्चेतून समोर आले आहे.देवळी येथे शेतकऱ्यांचा शेतकी माल बाहेरून जसे कापूस,चना,गहू व इतर शेतकऱ्यांचा शेतकी माल देवळी येथील कृषी उत्पन्न उप बाजार समितीच्या मार्केटात येतात यातच आज दि.१२ मार्च रोजी बाहेर ठिकाणावरून एका शेतकऱ्याने तात्पुरत्या किरायाने घेतलेल्या मालवाहू वाहणात कापूस भरून देवळी येथील उप बाजारात आणत असताना समितीच्या लिलावामध्ये लावण्यात आली असता तेथील व्यापाऱ्यांनी त्या मालाचा मोल ठरवून कापूस भरलेली गाडी जिनिंगला काटा पट्टी करण्याकरिता जात असताना मध्येच देवळी वाहतूक एका पोलीसांनी अडवून ही गाडी कुठे चालली व इतर विचारपूस करत असताना तुने सीट बेल्ट का बरं लावला नाही त्या वरून वाहन चालकाने सांगितले की माझ्या गाडीचे कागदपत्र सर्व आहेत असे सांगून मात्र त्या वाहतूक पोलिसांनी तुला एक हजार रुपये दंड भरावा लागेल अशी दमदाटी देऊन त्या वाहन चालकाकडून दोनशे रुपयाची अवैध वसुली करून त्या गाडी मालकाला पावती न देता पळ काढला असा हा प्रकार देवळी पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागात सुरू असल्याची देवळी शहरात खमंग चर्चा आहेत.तरी अशा वाहतूक पोलिसांवर कोणाचे अभय व कोणाचा आशीर्वाद असे चित्र आपल्याला दिसत आहे तरी अशा वाहतूक पोलिसावर काय कारवाई होणार याकडे आता शेतकरी व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहेत.बघत राहा (साहसिक News-/24 पुढील भागात व्हिडीओ फोटो सह (भाग २ मध्ये )(क्रमशः)