देवळीत एम.आय.डी.सी. परिसरात देशी-विदेशी दारू विक्रीचा धुमाकुळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा लगतेचे मार्केट संकुल मधील के. के. बिर्यानी, ऑनलाइन सेवा सेंटर पासून ते महालक्ष्मी कंपनीच्या गेट पर्यंत चक्क दारूचं-दारू.
देवळी तालुका प्रतीनिधी:
देवळी शहरालगत असलेल्या एम.आय.डी.सि परिसरात चक्क महालक्ष्मी कंपनीच्या गेट समोरचं दारूचा ठोक विक्रेता कुणाल तायवाडे हा खुलेआम देशी विदेशी दारूचा अवैध धंदा चालवतो. जुनी व्हील्स इंडिया म्हणजे आत्ताची जेट वर्क कंपनीच्या भिंती लगतंच मोठे अवैध शेड उभारून खुल्या स्वरूपात लायसन असल्याप्रमाणे दुकानदारी चालवितो.
कुणाल तायवाडे देवळी पोलीस ठाण्यातील डी.बी. पथक, बिट इन्चार्ज तसेच ठाण्यातील काही पोलिसांना महिन्याकाठी लाखो रुपये देण देत असल्याने स्थानिक पोलीस त्याच्या अवैध दारू व्यवसायावर कारवाई करण्यास धजावत नाही. येथील ठाणेदार राणे साहेब यांना या अवैध धंद्याची माहिती नाही का? डी.बी. पथकाचे प्रमुख तसेच त्यांचे तीन कर्मचारांना सुद्धा कुणाल तायवाडेच्या दारूच्या दुकानाबाबत माहित असून सुद्धा कारवाई का करत नाही या सगळा मॅनेजिंग व्यवस्थेमुळे दारू पिणाऱ्यांना एम.आय.डी.सि.परिसर रेस्टोरंट व बारचं असल्याचे वाटते.
देवळी पोलीस स्टेशन च्या पोलिसासोबत गोड संबंध असल्याने तायवाडे भाऊची बनावटी दारूची दुकानदारी अनेक दिवसापासून बिनधास्त सुरू आहे. या दारूच्या अवैध धंद्यावर पोलीस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांनी लक्ष्य देवून त्या बनावटी दारू पासून देवळी भागातील महिलांचे उध्वस्त होणारे संसार वाचवावे व दारू विक्रेता कुणाल तायवाडे याच्यावर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील महिला वर्ग करीत आहे.
तसेच, ठाणेदार राणे साहेबांनी कोणत्या कागदावर कुणाल भाऊला, खुशाल भाऊला दारू विक्री करण्याचे लायसन दिले त्या कागदाचा शोध पोलीस अधीक्षक साहेब घेतील का अशी कुचबुज देवळीकरांमध्ये सुरु आहेत. तसेच एम. आय. डी.सी. मधील कंपनीं लगतचे सर्व अवैध पानठेले, हॉटेल हे सगळे खानावळीच्या नावाखाली कुणालभाऊ व खुशाल भाऊची दारू विक्री करतात त्यामुळे सर्व अवैध हॉटेल्स, पानटपरी देवळी नगर परिषदेने काढून टाकून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी देवळी शहरातील विविध संघटनांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.