देवळी ते नांदोरा रस्त्यावरील जळलेली कार.देवळी यशोदा नदीच्या पुलावर जळलेली कार.
देवळी /पोलीस स्टेशन अंतर्गत लागोपाठ दोन चारचाकी वाहन आगीचे भक्ष्य ठरले. पहिली घटना नजीकच्या नांदोरा डफरे गावाजवळ गुरुवारचे रात्री ८ वाजता तर दुसरी घटना देवळी यशोदा नदीच्या पुलावर शुक्रवारचे सायंकाळी ५ वाजता घडली. दोन्ही घटनेत वायरिंगच्या शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचे सांगण्यात आले. वाहन जळण्याच्या दोन्ही घटनेत देवळी नप च्या अग्निशामक दलाने धाव घेवून आग नियंत्रणात आणली. यात सुदैवाने प्राणहानी टळली.नांदोरा डफरे येथील घटनेत एम एच ३१ सी आर २६६० क्रमांकाच्या स्वीफ्ट डिझायर गाडीने हिंगणघाट येथील मेंडे कुटुंबीय प्रवास करीत होते.या गाडीत दोन महिलांचा व तीन पुरुषांचा समावेश होता.दरम्यान सदर कुटुंबीय पुलगाव येथून हिंगणघाट कडे जात असताना गाडी अपघातग्रस्त झाली. काही कळण्याच्या आधीच चालू गाडीत वायरिंगने पेट घेतला व गाडी धुधु जळली. यावेळी प्रसंगावधान साधून गाडीतील प्रवाश्यांनी उडी घेतल्याने अनर्थ टळला.देवळीच्या यशोदा नदीवरील घटनेत फोर्ड कंपनीची एमएच १२ जीएफ ९६४१ क्रमांकाची गाडी वर्धेच्या कार जंक्शन गॅरेज मध्ये दुरुस्तीसाठी आली होती. गॅरेज चालक हेमंत मनवर यांनी ही गाडी ट्रायल साठी देवळीकडे आणली होती.दरम्यान यशोदा नदीच्या पुलावर गाडीच्या वायरिंगने अचानक पेट घेतला व पाहता – पाहता गाडी आगीचे भक्ष्य ठरली. संबंधित गाडी वर्धेच्या कामडे यांची असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही घटनेत देवळी पोलिसांनी तसेच अग्निशामक दलाचे अक्षय क्षीरसागर, रणजित दाबेकर व आसिफ शेख यांनी कामगिरी बजावली.