देवळीत सखे साजणी ने जिंकले रसिकांचे मन”(स्व. श्यामसुंदर अग्रवाल व्याख्यान मालेत ठेवले विचार….

0

देवळी -/ येथील साबाजी स्पोर्टस असोशिएशनचे व्दारा स्व.श्यामसुंदर मन्नालाल अग्रवाल यांच्या स्मृती दिनानिमीत्य दोन दिवसीय व्याख्यानमालेला श्यामसुंदर अग्रवाल धर्मशाळेत नागपुरचे सुप्रसिध्द कवी ज्ञाणेश वाकुडकर यांच्या ” सखेसाजणी”ने प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदिप दाते हे होते.तर साबाजी स्पोर्टसचे अध्यक्ष मोहन अग्रवाल,गणेश मालधुरे यांची उपस्थिती होती.४० व्या व्याख्यानमालेच्या निमित्याने वाकुडकर म्हणाले की कवीच्या अंतरात्म्याची आवाज म्हणजे कविता.कवितेत अश्लीलते एवजी शालीनता निरासगता असल्यास ती जास्त प्रभावी व लाभदायक ठरते. परिणाम कारक कविता ऐकणाऱ्यांच्या हृदयापर्यत पोहोचते.कविता हे हृद‌याला जोडण्याचे व तनाव कमी करण्याचे साधन आहे.वीररसचा कवी कमजोर मानवाला ही शक्तीशाली बनवू शकतो. आजच्या समाज जीवनातील वास्तवावर भाष्य करताकरता कवी ने सखे साजणी या कवितेव्दारे हळुच श्रृंगार रसात प्रवेश केला.किती दिशानी आला वारा, शोधित शोधित माझे गांव कुणास ठाउक किती फुलांचा ओठावरती माझे नांव,नदी या कवितेतुन स्त्री जीवनातील शोकांतिका मुखर केली.जहर खाऊ नका ही शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी कविता पैकवून श्रोत्यांना त्यांनी विचार मग्न केले.आपल्या कवितेतुन अखिल मानव जातीला प्रेम,कारुण्य आणि मानवतेचा संदेश देत ज्ञानेश वाकुडकरांनी तब्बल दोन तास भन्नाट मैफल रंगवली यात अंगार,श्रृंगार, विनोद आणि बरेच काही होते.डॉ.मालधुरे यांनी प्रास्ताविक केले.डॉ. राजश्री देशमुख यांनी सुत्र संचालन केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा.केशवराव कुवारे यांनी आणि आभार प्रदर्शन दिपक श्यामसुंदर अग्रवाल यांनी केले. या कार्यक्रमात देवळीच्या सर्व शाळा मधुन दहावीत ९६.६०% मार्क घेवून स्वंदन संजय अलोणे हा गुरुकुल विद्या निकेतनचा विद्यार्थ्याचा आणि बारावीत ज्ञान भारती क. महा. चा आर्या सचिन राऊत प्रथम आल्याबद्दल यांना प्रशस्तीपत्र रोख बक्षिस व मोमेंटो देवून सत्कार करण्यात आला.ज्ञानेश वाकुडकर यांचा मोहन अग्रवाल यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व मोमेंटो देवून सत्कार करण्यात आला.

सागर झोरे साहसिक news -/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!