🔥अंतोरा येथील शेतकरी महिलेची विष प्राशन करून आत्महत्या.
आष्टी शहीद -/ येथुन जवळच असलेल्या (जुना) अंतोरा गावातील महिलेने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे.सवित्तर वृत्त असे की,(जुना) अंतोरा येथील भाजपाचे प्रमुख कार्यकर्ते महेंद्र ललीतचंन्द्र गौरखेडे यांची पत्नी सौ.अर्चना महेंद्र गौरखेडे वय ४५वर्षे यांनी शासकीय बॅंकेचे आणि खाजगी कर्जाला कंटाळून स्वतःचे शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली.पती महेंद्र गौरखेडे हे पायाने अपंग असुन कुटुंबातील सर्व उदरनिर्वाह सदर महिलेवर होता. सदर महिलेवर खाजगी फायनान्स कंपनीचे आणि बँक ऑफ इंडियाचे कर्ज होते.सदर महिलेचे पती महेंद्र गौरखेडे यांच्या नावावर मौजा कवठाळ येथील सर्वे क्र ३७/६ आराजी ०.८२ आर (दोन एकर ) कोरडवाहू शेत आहे. सततची नापिकी आणि दुबार पेरणीचे संकट तसेच खाजगी कंपनीचे आणि बँक ऑफ इंडिया अंतोरा शाखेचे सन २०२९-२० मधील १५१४८०/- रूपये थकीत कर्ज आहे.यामुळे सदर महिलेने कर्जाला कंटाळून आपल्या स्वतःच्या शेतातील झोपडीत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. सदर महिलेमागे पती,दोन विवाहित मुली आणि म्हातारी सासु असा बराच मोठा आप्त परीवार आहे.त्यांच्या निधनाने अंतोरा सह परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.