🔥शेतात काम करताना शेतमजूर महिलेचा मृत्यू. कविता मारुती सुतारे व ४८ वर्ष
देवळी -/ ईसापुर शेतशिवारातील शेतात कपाशीला खत देण्याकरिता गेलेल्या मजूर महिलेचा शेतातच चक्कर येऊन पडून मृत्यू झाला.
ईसापुर शिवारात मिलिंद आंबटकर यांच्या शेतात कपाशीला खत देण्याकरिता मजूर महिला गेल्या होत्या त्यामध्ये सौ कविता मारुती सुतारे वय 48 वर्षे रा. सांडस त. कळमनुरी जि. हिंगोली ह. मु. ईसापुर ता. देवळी या मजुरी
करीता शेतात गेल्या असता त्यांना कपाशीला खत टाकताना सकाळी 11 वाजता दरम्यान अचानक चक्कर आला व त्या बेशुद्ध झाल्या तसेच शेतमालक मिलिंद आंबटकर यांनी मृतक सविता यांच्या मुलगा विकास यास फोन करून शेतात बोलून घेतले व दुचाकीने ग्रामीण रुग्णालय देवळी येथे नेले असता डॉक्टरानी त्यांना तपासणीनंतर मृत घोषित केले .
सदर महिला ही हिंगोली जिल्ह्यातील असून ईसापुर येथे
फडे -झाडू बनविण्याचा आपल्या परिवारासोबत काम करीत असत पण गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे सध्या त्यांना काम नव्हते व घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्या शेतावर मजुरी करिता जात होत्या अशातच त्याच्या चक्कर येऊन पडून मृत्यू झाला.
त्यांचा मुलगा विकास मारुती सुतारे यांच्या फिर्यादीवरून देवळी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून शवविच्छेदनाकरिता वर्धा येथे पाठविण्यात आले.त्यांच्या अशा एकाएकी मृत्यूने सर्वत्र हळूहळू व्यक्त होत आहे.