🔥ठाणेदार पवार यांना नुकतेच पार पडलेले गणपती विसर्जन मध्ये मर्यादेपेक्षा दुप्पट डीजेचे आवाजाची तक्रारी तर भोवल्या नाही. 🔥ठाणेदार पवार यांची बदली होताच,आष्टी वासियांनी टाकली कात अवैध दारू विक्री, शेतातील बॅटऱ्या चोरी,तहसील मधील चोरीस गेलेला ट्रॅक्टर, शहरातील ट्रॅक्टर चोरी प्रकरण यातील आरोपी शोध घेणार का.🔥नवनियुक्त ठाणेदार बबनराव पुसाटे यांनी स्वीकारला आष्टी पोलीस ठाण्याचा कार्यभार.
आष्टी शहीद -/ आष्टी तालुक्यातील गावात व शहरात अवैध दारुविक्री खुलेआम पद्धतीने सुरु असून, शेतातील सौर कुंपण बॅटऱ्या चोरीस जाणे, मोटार पंप,तहसील कर्यालयातून चोरीस गेलेला ट्रॅक्टर, आष्टी शहरात दोन दिवसापूर्वी क्षीरसागर यांचा चोरी गेलेला ट्रॅक्टर चा शोध लावणे व पोलीस प्रशासनावर वाचक न ठेवता ,कोणत्याही तक्रारीचे निवारण करने आष्टी येथील ठाणेदाराला जमले नाही. त्यामुळे ठाणेदारअप्रति शहरात व ग्रामीण भागात नाराजीचा सूर होता. त्याचप्रमाणे आष्टी हे तालुक्याचे स्थान असून पोलीस स्टेशन आहे की नाही हा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला होता आष्टी शहरांमध्ये अनेक शाळा व अनेक कार्यालय असून शहरांमध्ये ट्राफिक व्यवस्था अव्यय दारू पिऊन मस्ती करणारे काही दारूडे यावर प्रतिबंध लावण्यात अपयशी ठरलेले ठाणेदार सुनील पवार यांची बदली झाली. एवढे असून सुद्धा ठाणेदार पवार यांची बदली कोणत्याही प्रशासकीय कारणावरून न करता थेट वरिष्ठ अधिकाऱ्यां च्या दबावामुळे करण्यात आल्याचे समजून आलेले आहे ही बदली अगोदरच झाली असती तर आष्टी मध्ये वाढत गेलेले गुन्हे कुठेतरी थांबले असते आणि त्यांचे जागेवर नवीन ठाणेदार रुजू झाले आहे. नवीन ठाणेदार यांना मोठी आव्हानें पूर्णतवास न्यावी लागणार आहे. नेतील ही असा नागरिकांचा सूर आहे.सविस्तर असें कि,आष्टी तालुक्यातील शहीद भूमीचा वारसा असलेल्या गावात पोलीस ठाणे हे इंग्रज असताना अस्तिवात होते. तेव्हा पासून आष्टी शहरात पोलीस ठाणे हे निर्माण आहॆ. गेल्या दोन वर्षांपासून आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री व्यवसाय खुले आम पद्धतीने सुरु असून, जुगार ही खुले आम सुरु आहे. शेतातील सौर कुंपना साठी लावलेल्या बॅटऱ्या चोरीस गेल्या चोरून नेणारे गावातील असून त्यांची नावे शेतकरी सांगतात पण आष्टी पोलिसांनी त्यांची साधी चौकशी केली नाही. शिक्षक राजेंद्र कुरवाडे यांच्या शेतातून लोखडी अँगल चोरीस गेल्याची घटना घडली तक्रार झाली पण चोकशी झाली नाही. तहसील कार्यलय मधून रात्री ट्रॅक्टर चोरीस जातो तरी ट्रॅक्टर चोरून नेणारा आरोपी अदयापही पोलिसांना गावसाला नाही. आष्टी शहरातील शेतकऱ्यांच्या शेतातील बॅटऱ्या चोरी जातात अशी माहिती पोलिसांना दिली जाते तरी कार्यवाही झाली नाही.थार मार्गांवर चोरट्याचा अपघात होतो चोरून आणलेले साहित्य त्यांच्या कडे सापडते तक्रार दिली जाते यां प्रकरणात चौकशी होत नाही. आरोपी खुलेआम गावात फिरतो.आबाद किन्ही येथे बस ला अडवून व बस मध्ये घुसून शालेय विध्यार्थी यांना मारहाण केली जाते तरी यां प्रकारात साधी विचारपूस केली जात नाही.सामान्य नागरिक धस्तावले होते आष्टीत कायदा आहॆ किंवा नाही. असें अनेक प्रकरण आहे कि त्या प्रकरणात नागरिकांना न्याय दिला नाही. आष्टी शहरातील एका विधवा मुलीची तक्रार असताना त्या तक्रारी कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले आणि न्याय मिळाला नाही म्हणून तिने आत्महत्या केली व यां प्रकरणात चुप्पी साधन्यात धन्यता मानली.नानाविध प्रकारात आष्टी पोलिसांनी दुर्लक्ष केलें होते. यां सर्व प्रकरणात आढावा घेतला असता मोठे जण आंदोलन उफाळून येण्याची दाट शक्यता होती म्हणून यां बाबीची कल्पना वरिष्ठ पोलीस उपविभागीय अधिकारी खंडेराव यांच्या कडे करण्यात आली. याचेच फलित म्हणून आष्टी ठाणेदाराची तडकाफडकी बदली, झाली असावी आणि त्यांचे जागेवर नवीन ठाणेदाराची वर्णी लावली आहे.नवीनयुक्त ठाणेदार यांनी आष्टी करांच्या समस्या तात्काळ मार्गी लावाव्या अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. नवीन ठाणेदार आल्याने आता कुठे कायद्याचा धाक नागरिकांना जाणवत आहे. नवीन ठाणेदार ही आव्हाने, व समस्या चे निराकरण करतील अशी आशा आहे.