“निंबोलीत सीएसआर फंडातून घरकुल मंजूर करून आणण्याचे काम आजवरचे सर्वोत्तम काम”-सुमित वानखेडे….

0

🔥”प्रथमच महापारेषणच्या सीएसआर फंडातून साकारणार 45 घरकुल,सुमित वानखेडे.

🔥सीएसआर फंडातून मंजुरी असलेल्या घरकुलचे सुमित वानखेडेंच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.

🔥निंबोलीत 45 घरकुलांना 90 लाख मंजूर, सुमित वानखेडेंच्या प्रयत्नांना यश.

आर्वी -/ तालुक्यातील पुनर्वसित गाव निंबोली (शेंडे) येथे सुमित वानखेडे यांनी महापारेषणच्या सीएसआर फंडातून 2 लाख प्रती घरकुल याप्रमाणे 45 घरकुलासाठी 90 लाख रुपये मंजूर करून दिल्याने निंबोली (शेंडे) ग्रामस्थांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना सुमित वानखेडे यांनी महापारेषणचे अभिनंदन करत सांगितले की, मी आता पर्यंत केलेल्या कामांपैकी सर्वोत्तम काम जर कोणचे असेल तर ते निंबोली साठी महापारेषणच्या सीएसआर फंडातून घरकुल मंजूर करून आणणे हेच असेल. त्याला कारणही तसेच आहे की, महापारेषणच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच व्यक्तिगत लाभासाठी त्यांनी निधी दिला आहे. निंबोली जुने गावाला भेट दिली होती तेंव्हा प्रकल्पग्रस्तांची परिस्थिती बघितली होती. तुटपुंज्या मोबदल्यातून पुनर्वसित गावात नव्याने घर बांधणे आर्थिक परिस्थिती मुळे अशक्य असल्याचे लक्षात आले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास हि बाब आणून दिली. लोकांची निवाऱ्याची मुलभूत गरज पुर्ण व्हावी म्हणून महापारेषणला सीएसआर फंडातून 45 कुटुंबांना मदत व्हावी यासाठी फडणवीसांनी आदेश दिले. सीएसआर फंडातून व्यक्तिगत लाभ देण्याचा नियम नसल्याने अडचण निर्माण झाली. त्यावर महापारेषणच्या बोर्डने मिटिंगमध्ये एकमताने निर्णय घेऊन हे घरकुल मंजूर करण्यात आले. योग्यवेळी आणि वेळोवेळी पाठपुरावा केल्याने हे घरकुल आता प्रत्यक्षात साकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना सुमित वानखेडे म्हणाले की, एकेकाळी सदन असलेले गाव ज्याचे नाव संपूर्ण जिल्ह्यात होते त्या गावावर पुनर्वसन झाल्याने बिकट परिस्थिती ओढवली होती. तेंव्हा नेत्यांनी गावाकडे लक्ष दिले नाही. मुख्यमंत्री असतांना देवेंद्र फडणवीस यांनी निम्न वर्धा प्रकल्पग्रस्त वसाहतीमध्ये असलेल्या भुखंडाचे भोगवटदार क्रमांक 1 चे 7/12 दिले. इतकेच काय तर पुनर्वसित वसाहतीमध्ये 18 नागरी सुविधांसाठी 35 कोटींचा निधी मंजूर करून दिला होता असे ते म्हणाले. या कार्यक्रमाची सत्कार मुर्ती सुमित वानखेडे हे होते तर मंचकावर गावच्या प्रथम नागरिक सौ. प्रणाली राजेंद्र भगत सरपंच, अमोल शेंडे उपसरपंच, विजय बाजपैयी विधानसभा प्रमुख भाजपा, वैभव भेंडे सहायक अभियंता पारेषण वर्धा, राजाभाऊ गोडसे, अरुण गेडाम, बाळाभाऊ सोनटक्के, ओमप्रकाश शेंडे, अश्विन शेंडे, सचिंद्र कदम, अरविंद कदम,धर्माजी तेलमोरे, बबलू भगत चरडे मॅडम ग्रा. पंत. सचिव यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओमप्रकाश शेंडे यांनी केले तर विजय बाजपैयी, बाळाभाऊ सोनटक्के, राजाभाऊ गोंडसे, वैभव भेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन रंजन शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन नैना राहुल भगत यांनी केले. सुरवातीला या भुमिपुजन व सत्कार समारंभाची वाजतगाजत सुरवात केली. मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या फोटोचे पुजन करण्यात आले. या कार्यक्रमाला निंबोली (शेंडे) व परिसरातील महिला पुरुषांची लक्षणीय उपस्थिती होती.

राजू डोंगरे साहसिक news -/24 आर्वी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!