🔥नियोजनाची जोड आणिकार्यकर्त्यांची जिद्द: ‘मन की बात’ मध्ये आर्वी विधानसभा महाराष्ट्रात अव्वल!
🔥आमदार सुमितभाऊ वानखेडे यांनी हाती घेतलेल्या उपक्रमाला जनतेकडून भरभरून प्रतिसाद.
आर्वी,वर्धा -/ जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघाने राजकीय आणि रचनात्मक,प्रेरणादायी, कार्याचा एक नवा आदर्श पुरोगामी महाराष्ट्रासमोर ठेवला आहे.भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे १०० टक्के यशस्वी आयोजन करून आर्वी विधानसभेने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. हे ऐतिहासिक यश म्हणजे आमदार सुमितभाऊ, वानखेडे यांचे कुशल नियोजन,संघटन चातुर्य, राजकीय कौशल्य, भाजपच्या पदाधिकाऱ्यांची सक्षम फळी आणि बूथ प्रमुखांची मेहनत यांचा त्रिवेणी संगम ठरला आहे.
आर्वी, आष्टी आणि कारंजा या तिन्ही तालुक्यातील ३१० पैकी ३१० बूथवर एकाच वेळी कार्यक्रम पार पडणे, हे एका मोठ्या ‘टीम वर्क’चे मोठे फलित आहे. तालुका आणि शहर पातळीवरील पक्षाच्या विविध,पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागाची जबाबदारी अत्यंत चोखपणे आणि जबाबदारीने पार पाडली, तर बूथ प्रमुखांनी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून ५,१५५ नागरिकांना या उपक्रमाशी जोडले. बूथ प्रमुखांनी घराघरांत जाऊन नागरिकांना निमंत्रित केले. पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक बूथवर झालेल्या या शिस्तबद्ध, आयोजनामुळेच आज आर्वीचे नाव संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या पटलावर चमकले आहे.त्यामुळे आर्वीच्या गौरवात मानाचा तुरा रोवला आहेत, हे.विशेष म्हणावे लागेल.. संपूर्ण आर्वी, आष्टी, कारंजा या भागातील.. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करतानाच, आमदार सुमितभाऊ वानखेडे यांनी पक्ष संघटना बळकट करणी व ग्राऊंड लेव्हल वर, मजबूत करण्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यांनी वेळोवेळी पदाधिकारी आणि बूथ प्रमुख यांच्या एकत्रित बैठका घेऊन त्यांच्यात सहकारी भावना आणि सलोखा निर्माण केला. “नेता हा केवळ दिशा दाखवतो, पण ती वाटचाल कार्यकर्त्यांच्या बळावरच यशस्वी होते,” हा विश्वास वानखेडे यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केला आहे. विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्यात पदाधिकारी आणि बूथ प्रमुखांची जोडगोळी नेहमीच तत्पर असते.
एकाच वेळी ३१० केंद्रांवर अशा प्रकारे १०० टक्के उपस्थिती लावणे, हे आर्वीच्या राजकीय परिपक्वतेचे लक्षण मानले जात आहे. शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही स्तरांवरील कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केल्यामुळेच आमदार सुमित वानखेडे यांच्या नेतृत्वाला ही भरघोस पावती मिळाली आहे. तसेच आगामी काळासाठी कार्यकर्त्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे.सुमितभाऊ यांच्या अचूक नियोजनाखाली आर्वी मतदारसंघात विविध विकासाच्या योजना कार्यान्वित होत असल्याने आर्वीकरांनी समाधान व्यक्त केले आहेत.