साहुर,आष्टी -/तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून पाऊस नसल्याने शेतकरी हैराण झालेला आहे सुरुवातीला एक दोन पाऊस आष्टी तालुक्यात झाले आणि हवामान खात्याने सुध्दा सांगितले की या वर्षी पाऊस सुरवाती पासुनच होणार आहे त्यामुळे सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये कपाशी तूर सोयाबीन इत्यादींची पेरणी केली परंतु हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला आणि शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे पंधरा दिवसात कोमेजून गेले त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे पेरणीसाठी होता नव्हता सर्व पैसा लावला परंतु पाऊस नसल्याने सर्व बियाणे कोमेजून गेले आणि शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले कारण शेतकऱ्या जवळ पैसा नसल्याने बी बियाण्याची तडजोड करणे शक्य नाही त्यामुळे काय करावे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे साहुर गावातील महिलांनी धार्मिक सप्ताह साई मंदिरात सुरू केला सप्ताह होतही आला तरी सुध्दा पाऊसाचा पत्ता नाही त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून साई मंदिर परिसरातील महिलांनी डोक्यावर गुंड घेऊन हनुमानजीच्या मंदिरात जाऊन हनुमानजीच्या डोक्यावर पाणी टाकले जणेकरून तो पाण्याचा लोट नदीवर जाईल इतकी मेहनत महिलांनी बळीराजा करीता केली तरी मात्र शासनाला जाग येत नसल्याचे दिसून येत आहे जगाच्या पोशिंद्याला उपाशी मरावे लागेल की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.