वर्धा -/ शेतकऱ्यांना कार्यशाळेत कामगंध सापळ्याचे मोफत वाटप
गजानन महाराज मंदिर पिंपळगाव येथे बी. सी. आय. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एल.डी.सी मार्फत सी.एस.आर जागृती प्रकल्प अंतर्गत वेलस्पन फाउंडेशन फॉर हेल्थ अँड नॉलेज वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक नियंत्रण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एल.डी. सी.चे तुकाराम बादाडे पाटील तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शिरीषजी नागतोडे त्याचप्रमाणे सिद्धेश्वर चरडे, मंदिराचे अध्यक्ष किशोर खेलपांडे वेलस्पन फाउंडेशन चे पि.यू व्यवस्थापक दीपकजी खांडे उपस्थित होते.
एल डी सी तर्फे कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या जागृती प्रकल्प बाबत, इतर कृषी निविष्ठांच्या योग्य वापरा संदर्भात शेतामध्ये होत असलेल्या आधुनिक बदलांबाबत तुकाराम बादाडे पाटील यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले
वेलस्पन फाउंडेशन चे पी.यू व्यवस्थापक दीपक जी. खांडे यांनी शेतकऱ्यांना
गुलाबी बोंड आळी चे व्यवस्थापन कसे करता येईल याबद्दल आणि तिचे जीवन चक्र कशी असतात याबद्दल समजून सांगितले तसेच कॉकटेल फवारणी कॅलेंडर स्प्रे, रँडम स्प्रे करु नये, मोनोक्रोटोफस चा वापर करु नये ,फवारणी करतांना पी.पी.ई.किट चा वापर करावा, मित्र किड व शत्रु कीडी बाल मजूर इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी प्रत्येक शेतकऱ्याला कामगंध सापळ्याचे मोफत वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन हे सचिन शेंडे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन सतीश हिवरकर यांनी केले यशस्वीतेसाठी वेलस्पन फाउंडेशन फॉर हेल्थ अँड नॉलेज वर्धा संस्थेच्या चमुचे आणि गावातील मंडळीचे सहकार्य लाभले.