🔥“प्रश्न विचारला म्हणून ‘ठुसे’ मारण्याची भाषा? सातोडा सरपंच गौरव गावंडे च्या कथित वक्तव्याने खळबळ!”
🔥हाच तो सातोडा ग्रामपंचायत सरपंच गौरव गावंडे प्रश्न विचारला म्हणून ठुसे मारण्याची भाशा वापरणारा.
वर्धा -/ ग्रामसभा ही गावकऱ्यांनी प्रश्न विचारण्यासाठी असते की सरपंचांच्या मर्जीप्रमाणे शांत बसण्यासाठी? ग्रामसभेत विकासकामांचा आणि खर्चाचा जाब विचारला म्हणून संबंधित व्यक्तीला ‘दोन ठुसे मार, तुला काहीही होणार नाही, मी सर्व बघून घेईन’ अशा आशयाचे कथित वक्तव्य केले जात असेल, तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी मारहाणीची भाषा का?
🔥ग्रामसभेत प्रश्न विचारणे गुन्हा आहे का?
🔥प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी ‘दोन ठुसे मार’ची भाषा का?
🔥‘मी सर्व बघून घेईन’ असे म्हणण्यामागे नेमका अर्थ काय?
🔥सरपंचांना नेमका कोणाचा राजकीय अथवा प्रशासकीय वरदहस्त आहे?
🔥विकासकामांवरील प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी प्रश्नकर्त्याला गप्प करण्याचा प्रयत्न?
🔥कथित ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्याची गरज.
🔥वक्तव्य खरे असल्यास प्रशासन संबंधितांवर कारवाई करणार का?
“सातोड्यात ग्रामसभेत दीपक भुते या युवकाने प्रश्नांचा भडीमार केला त्यामुळे प्रश्न विचारले म्हणून ठुसे मारण्याची भाषा होत असेल, तर ही केवळ एका व्यक्तीची बाब नाही—हा लोकशाहीवरचा प्रश्न आहे. ‘मी सर्व बघून घेईन’ म्हणण्याइतका अधिकार सरपंचांना कुणी दिला? आता प्रशासनाने ऑडिओची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे!”(क्रमशः-/बघा पुढील भागात ऑडिओ रेकॉर्ड व्हिडिओ रेकॉर्ड काही वेळातच)