फळभाजी विक्रेत्यासाठी संभाजी ब्रिगेड मैदानात…

0

🔥आजपासून आझाद मैदान येथे आमरण उपोषण.

यवतमाळ -/ गेल्या तीन दिवसापासून शांततेच्या आणि संविधानिक पद्धतीने नगरपरिषद यवतमाळ यांच्यासमोर धरणे आंदोलनासाठी आम्ही आमच्या मागण्या घेऊन बसलेलो असताना शासनाचा आणि प्रशासनाचा कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आम्हाला आता आमरण उपोषणाशिवाय पर्याय राहणार नाही.आमचा गरीबाचा वाली कोणीच नाही याच अर्थाने आज आमच्यावर पाळी आली आहे आम्हाला केवळ फक्त मतदाना पुरतं वापरल्या जातात आणि नंतर कुठलाही विचार केल्या जात नाही आज आमच्यावर उपासमारीचे पाळी आली आहे आमच्या घरातील लेकरांच्या शाळेची फी देणे होत नाही आहे जेवणासाठी तळमळ सुरू आहे तरीही शासनाला आणि प्रशासनाला याचा कुठलाही फरक पडत नाही त्यामुळे आज दिनांक ८ फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाला बसणार आहोत याचे निवेदन जिल्हा अधिकारी साहेब तसेच मुख्य अधिकारी नगर परिषद साहेब यांना दिली आहे.संपूर्ण जबाबदारी ही शासनाची प्रशासनाची नाही जर लवकरात लवकर आमचा निर्णय लागला नाही तर यापेक्षाही आक्रमक आंदोलन आम्ही करणार आहोत याची दक्षता शासनाने आणि प्रशासनाने घ्यावी असे अध्यक्ष सुरज  खोब्रागडे यांनी सांगितले सोबतच त्रिशूल मोकाटे ,नंदू काथोडे, खलीलभाई ,टी सी जावेद,यांनी सांगितले उपोषण करते त्रिशूल माकोळे, खलीद शेख, शैलेश फुलके, सलीम शाह, इफेकार अहमद, राहुल मिश्रा, गजू रामटेके, संजय गायकवाड, दादाराव गायकवाड, सैय्यद इमरान , राजू शाहा, केतन
गावंडे हे सर्व आमरण उपोषणाकरिता बसणार आहे याची दक्षता आणि जिम्मेदारी सर्व शासनावर आणि प्रशासनावर राहील.

दीपक यंगड साहसिक NEWS-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!