🔥बँक ऑफ इंडिया साहुर मधुन निराधार,दिव्यांग ,विधवा , पशुपालक,शेतकरयांना पैसे मिळत नसल्याने हाहाकार.
साहुर -/ आष्टी तालुक्यातील साहुर येथील बँक ऑफ इंडिया मध्ये एनपीए झालेल्या ग्राहकांना आपल्या खात्यातून पैसे मिळत नसल्याने हाहाकार निर्माण झाला असून निराधार दिव्यांग विधवा पशुपालक शेतकरयांवर उपासमारीची वेळ आलेली आहेत साहुर गावातील अनेक शेतकऱ्यांकडे बँक ऑफ इंडिया साहूर चे पीक कर्ज असून त्यामुळे त्यांची खाती एनपीए झालेली आहेत त्यामुळे ज्यांना निराधार दिव्यांग पशुपालक विधवा स्त्रियांना शासनाकडून जे मानधन मिळतात ते सुद्धा बँक ऑफ इंडिया साहुर मध्ये देत नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे पशुपालक आर्थिक अडचणीत सापडलेला आहे दुध डेअरीवर पशुपालक दुधाची विक्री करित असुन त्यांचे पैसे आठवडा झाला की पशुपालकांच्या खात्यात पैसा जमा होतो परंतु बँकेमधून पैसे मिळत नसल्याने पशुपालक मोठ्या अडचणीत सापडलेला आहे आजपर्यंत स्वतःच्या खात्यातून पैसे काढता येत नव्हते परंतु ते पैसे दुसऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर करून काढावे लागत होते त्यामुळे निराधार, दिव्यांग ,विधवा, पशुपालक व शेतकरयांना थोडाफार दिलासा मिळाला होता परंतु आता मात्र स्वतःच्या खात्यातून पैसे काढता येत नाही आणि दुसऱ्याच्या खात्यात टाकताही येत नसल्याचे बँक ऑफ इंडिया शाखा साहुर च्या व्यवस्थापकाने सांगितल्याने ग्राहकांमध्ये बँक ऑफ इंडिया शाखा साहुर बाबत तीव्र आक्रोश निर्माण झाला आहे त्यामुळे ग्राहक त्रस्त झालेले असुन साहुर गावात बँक ऑफ इंडिया ही एकमेव शाखा असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे याविषयी वरिष्ठांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्राहक करीत आहे एकीकडे शासनाकडून सांगितल्या जातात की पीक कर्जाची वसुली केल्या जाणार नाही मात्र साहुर येथील बँक ऑफ इंडिया मध्ये ज्यांच्यावर पीक कर्ज थकीत आहे त्यांना पैसे देणे सुद्धा बंद केलेले आहेत निराधार दिव्यांग विधवा पशुपालक यांना मिळणाऱ्या मानधनाचे सुद्धा पैसे देणे बंद केले आहे त्यामुळे बँकेच्या या मनमानी कारभारामुळे निराधार दिव्यांग विधवा थकीत कर्जदार शेतकरी पशुपालक वैतागून गेलेले आहेत म्हणून वरिष्ठांनी लवकरात लवकर चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहे याबाबत काही दिवसात ग्राहकांच्या वतीने निवेदन देऊन उपोषणाला बसणार असल्याचे ग्राहकांनी सांगितले.