बंजारा तांडा समृध्दी योजनेच्या समिती,सदस्यपदी सौ. संध्याताई प्रफुल्ल राठोड यांची निवड..

0

                    बंजारा तांडा समृध्दी योजनेच्या समिती,सदस्यपदी सौ. संध्याताई प्रफुल्ल राठोड यांची निवड.

श्रीक्षेत्र माहूर -/ महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृध्दी योजनेच्या जिल्हा समितीच्या सदस्यपदी सौ.संध्याताई प्रफुल्ल राठोड यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाकडून नुकतीच करण्यात आली असल्याचा शासनाकडून आदेश प्राप्त झाला आहे.
राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या वतीने संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृध्दी योजनेंतर्गत तांडा वस्तीवर करावयाच्या कामासाठी ग्राम पंचायतींकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा प्राधान्यक्रम व निकड लक्षात घेऊन कामाची निवड करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीमध्ये बंजारा / लमाण समाजाचा प्रतिनिधी-अशासकीय सदस्य म्हणून, मांडवी येथील संध्याताई प्रफुल्ल राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड पुढील ३ वर्षाकरिता राहणार असल्याचे शासनाच्या ९ ऑगस्ट २०२४ च्या आदेशात नमूद केले आहे.
संध्याताई राठोड यांच्या या झालेल्या नियुक्तीमुळे बंजारा समाजातून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच बंजारा समाज बांधवांकडून व तसेच सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक news-24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!