बलात्कार गुन्ह्यातल्या फरार आरोपीला मुंबई येथून बिडकीन पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

0

तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत कृष्णापुर येथे २९ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी दिनांक १४ फेब्रुवारी रोजी बिडकीन पोलीस ठाण्यात चौघा विरोधात विविध कलामांतर्गत गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक करण्यात आली होती.सदरील गुन्ह्यातील अरमान सह दोघे फरार झाले होते.सदरील गुन्ह्याचा समांतर तपास चालू असतांना खबऱ्याने दिलेल्या माहिती नुसार तसेच तांत्रिक विश्लेषणा आधारे आरोपी अरमान उर्फ फिरोज अहमद सलमानी रा. मोहाली.पंजाब हा मुंबई येथे सांताक्रूझ पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या झोपडपट्टीत लपून बसलेला समजल्याने दिनांक १२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजे दरम्यान अथक परिश्रम करीत सांताक्रूझ पोलिसांच्या मदतीने मोठ्या शिताफीने फरार आरोपीला बेड्या ठोकून ताब्यात घेत १३ मार्च रोजी बिडकीन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.सदरची कार्यवाही ही ग्रामीण जिल्हा अधीक्षक मनीष कलवानिया,अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार,उपविभागीय पैठण पोलिस अधिकारी डॉ.सिध्देश्वर भोरे,बिडकीन पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक माने,राहुल बल्लाळ,विजय कोळेकर,रावसाहेब राठोड या चौघांनी सर्च ऑपरेशन करीत अथक प्रयत्नाने फरार आरोपीला जेरबंद केले.सदरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती जनाबाई सांगळे या करीत असल्याची माहिती रात्री नऊ वाजे दरम्यान मिळाली.

साहसिक न्यूज /24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!