बाबुळगाव तहसीलदारांचा ‘रेती-राज’ तहसीलदार मीरा पागोरे आणि ‘वसुली किलर’ सय्यद यांचा उघड माज! ​मंत्र्याच्या नावाचा गैरवापर करत रेती माफियांचे रक्षण; तालुक्यातील नदीपात्रात दिवसाढवळ्या दरोडा!….

0

🔥हाच तो रेती माफिया चा दलाल यामिन सैयद.🔥ह्याच त्या मंत्री अशोक उईके यांच्या नावाचा वापर करून रेती माफिया यांना सहकार्या करणाऱ्या तहसिलदार मीरा पागोरे.

🔥बाबुळगाव तहसीलदारांचा ‘रेती-राज’ तहसीलदार मीरा पागोरे आणि ‘वसुली किलर’ सय्यद यांचा उघड माज!

🔥​मंत्र्याच्या नावाचा गैरवापर करत रेती माफियांचे रक्षण;
तालुक्यातील नदीपात्रात दिवसाढवळ्या दरोडा!

​बाबुळगाव -/ यवतमाळ जिल्ह्याचे रेती तस्करीचे ‘एपिसेंटर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबुळगाव तालुक्यात सध्या प्रशासकीय अराजकता माजली आहे. येथील तहसीलदार मीरा पागोरे आणि त्यांचा तथाकथित उजवा हात, ‘वसुली किलर’ म्हणून कुप्रसिद्ध असलेला मंडळ अधिकारी यामीन सय्यद यांनी मिळून सरकारी नियमांची होळी केली आहे. विशेष म्हणजे, या भ्रष्टाचारामध्ये राज्याचे मंत्री आणि स्थानिक आमदार अशोकराव उईके यांच्या नावाचा ढाल म्हणून वापर केला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
​बाबुळगाव तालुक्यातून वाहणाऱ्या बेंबळा नदीच्या पात्रातून अवैध रेती उपसा करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाने जणू काही ‘अधिकृत परवाना’ जाहीर केला आहे, पण तो सरकारी तिजोरीसाठी नसून स्वतःच्या खिशासाठी! ​प्रति टिप्पर ५० हजार रुपये महिना. ​प्रति ट्रॅक्टर ३० हजार रुपये महिना.
​हा ‘हप्ता’ जमा करण्याची जबाबदारी मंडळ अधिकारी यामीन सय्यद याच्याकडे सोपवण्यात आली आहे. “पैसे द्या आणि बिंदास चोरी करा,” असे तोंडी आदेश खुद्द तहसीलदार पागोरे यांनी माफियांच्या बैठकीत दिल्याचा खळबळजनक आरोप आता होत आहे.
​​बाबुळगाव तालुक्यातील तांबा, नांदे सावंगी, वाटखेड, भयपूर, काशी, मागसावगी आणि सौजाणा या घाटांवर सध्या कायद्याचे राज्य नसून माफियांचे राज्य आहे. यामीन सय्यद हा अधिकारी स्वतःला या घाटांचा मालक समजून वावरत आहे. “आमदार आणि मंत्री अशोक उईके माझे निकटवर्तीय आहेत, माझ्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही,” अशी दर्पोक्ती हा अधिकारी करत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. ​जिल्ह्याची संपूर्ण रेती तस्करीची सूत्रे बाबुळगाव तहसील कार्यालयातून हलवली जातात. बेंबळा नदीच्या पात्रात रात्रीच्या अंधारातच नव्हे, तर आता दिवसाढवळ्या फायबर बोटी आणि पोकलेन मशीनच्या साहाय्याने नदीची छाती फाडली जात आहे. येथून उपसलेली रेती नेर, दारव्हा, दिग्रस, पुसद आणि अगदी अमरावतीपर्यंत तस्करी केली जात आहे. पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. ​जेव्हा तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर यंत्रांच्या साहाय्याने अवैध उपसा होतो, तेव्हा तहसीलदार मीरा पागोरे यांना याची कल्पना नाही, यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. यामीन सय्यद हा ‘वसुली किलर’ दरमहा लाखो रुपयांची माया गोळा करून मॅडमपर्यंत पोहोचवत असल्यामुळेच तहसीलदार या संपूर्ण प्रकारावर मौन बाळगून आहेत, हे स्पष्ट दिसते.
​​एकीकडे सरकार ‘भ्रष्टाचारमुक्त प्रशासना’च्या गप्पा मारत असताना बाबुळगावमध्ये मात्र महसूल विभागाचे अधिकारी आणि रेती माफिया यांचे ‘फेविकॉलचे जोड’ पाहायला मिळत आहे. या लाचखोर तहसीलदार आणि त्यांच्या वसुली एजंटवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा जिल्हाधिकारी कधी कारवाई करणार? की आमदारांच्या नावाखाली ही लूट अशीच सुरू राहणार? असा सवाल सामान्य जनता विचारत आहे.
​बाबुळगाव तहसीलमध्ये सुरू असलेल्या या महाभ्रष्टाचाराचे पुरावे आता समोर येत आहेत. जर वरिष्ठ प्रशासनाने यावर तात्काळ पाऊल उचलले नाही, तर हा जनक्षोभ रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. ‘वसुली किलर’ यामीन सय्यद आणि तहसीलदार मीरा पागोरे यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे, हीच आता प्रमुख मागणी आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 बाभुळगाव 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!