बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महिला आघाडीतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

0

🔥बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महिला आघाडीतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

 हिंगणघाट -/ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महिला आघाडी, हिंगणघाटच्या वतीने आज रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ठीक ४ वाजता संत तुकडोजी वार्ड क्रं ५ (पाच) येथील माननीय बाळासाहेब ठाकरे उद्यानात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

  या कार्यक्रमाला शिवसेना वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी राज्यमंत्री, माजी आमदार श्री. अशोकभाऊ शिंदे, जिल्हाप्रमुख श्री. राजेन्द्रभाऊ खुपसरे तसेच उपजिल्हाप्रमुख श्री. सतीशभाऊ धोबे, तालुकाप्रमुख मनीषभाऊ देवडे, शहर प्रमुख सचिनभाऊ पोटदुखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 यावेळी महिला आघाडीच्या माजी नगराध्यक्ष सुधाताई शिंदे, नगरसेविका सौ. सारिकाताई अनासाने, नगरसेविका सौ. राजश्रीताई देवडे, माजी नगरसेविका सौ. नीताताई धोबे, कार्यक्रमाच्या संयोजिका तथा प्रस्ताविक सौ. करुणाताई वाटकर, शहर संघटिका सौ. सीमा गलांडे यांच्यासह महिला पदाधिकारी, शिवसैनिक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔥वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश.

  यावेळी नगरसेविका सौ. सारिका अनासाने यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, वृक्ष हे केवळ निसर्गाचे सौंदर्य वाढविणारे घटक नसून आपल्या पुढील पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वृक्षारोपणासारखा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे ही त्यांना खरी आदरांजली असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाप्रमुख श्री. राजेंद्र खूपसरे यांनी आपल्या मनोगतात समाजकारण आणि राजकारण हे समाजहिताशी जोडलेले असावे, असे सांगत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे स्पष्ट केले. वाढते प्रदूषण, कमी होत जाणारे वृक्षक्षेत्र आणि बदलते हवामान यांचा विचार करता वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या झाडांचे संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी राज्यमंत्री, माजी आमदार श्री. अशोकभाऊ शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणातून वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले. बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच समाजाशी जोडलेले कार्य करण्याची प्रेरणा दिली असून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करणे ही काळाची गरज आहे. केवळ वृक्ष लावणे नव्हे, तर लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करून ते मोठे करण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी आणि नागरिकांनी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.सध्याची महायुती चे सरकारने तीन कोटी झाडे संपुर्ण महाराष्ट्रात लावण्याचे कागदावर मंजूर केले परंतु वास्तविक पाहता झाडे लावण्याचे आता आणि पता नाही पण तोडण्यात सरकार पूर्ण ताकतीने लागून आहे.जनतेनी सुध्दा या बाबत जागृत राहिले पाहिजे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. करुणाताई वाटकर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रकाश अनासाने यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. सीमा गलांडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून *“वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरण वाचवा”* असा सामाजिक व पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला शिव सेनेचे सुनील आष्टीकर, शितल चौधरी,गजानन काटवले, हिरामण आवारी,प्रमोद एडलेवार, लक्ष्मण बकाने, अनंता गलांडे, अविनाश धोटे,आशिष वाघ,पंकज ठाकरे,सचिन मुडे, भास्कर ठवरे,शंकर मोहमारे, गुणवंतजी वानखेडे, सौ. नीलिमाताई मोहमारे,सौ. उषाताई चौधरी, सौ. प्रियांकाताई धोटे, सौ. कलावतीताई निखाडे,सौ. मेघाताई गुळकरी,सौ. कांचल निमजे,श्रीमती अर्चनाताई पांडे,कु. हर्षिता वाटकर, कु. गवरी पडादे,कु. शुभवी निमजे, कु. शिवण्या पाके,सौ. शोभाताई कन्नाक्के,सौ. शुभांगी ताई भजभुजे, सौ. संगीताताई आंबरवेले, सौ. ज्योतिताई आंबरवेले, सौ. सरोजनीताई कोरडे,सौ. कल्पनाताई खंदारे,सौ. भारतीताई पराते,सौ. सुनिताताई सागरकर,सौ. शुभांगी मंदरे,सौ. दुर्गाताई बोरकर,सौ. अनिताताई गौतम,सौ. रेखाताई पाके,सौ. ज्योतीताई चाडगे, सौ. गंगाताई कुंभरे,सौ. पुष्पाताई गिरडे,सुरेशजी वाटकर सर, भास्कर भिसे, जयकुमार रोहनकर,श्रीकांत निमजे, दिनेश धोबे,नरेंद्र गुळकरी, मारोती अराडे,कृष्णा चौधरी, नानाभाऊ ठोंबरे,यशवंतजी कुंभारे,श्रीकृष्ण रामगडे,उमेश निनावे,मारोतीजी पाके,वसंतरावजी गिरडे,आंबदासजी मोहदूरे, राजेशजी कोरडे,सुधाकरजी चिकलकर,हेमंत चिरकुटे, वीरेंद्र पाके,नरेश खुरपुढे, दिलीप झोरे, लक्ष्मीकांत भगत,पप्पू घवघवे,विजय कोरडे, गणेश वडुले, गोलू काटकर, बलराज डेकाटे दिलीप भोपळे,परिसरातील सन्माननीय नागरिक, महिला पदाधिकारी, शिवसैनिक व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         ईकबाल पहेलवान साहसिक        News-/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!